शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्चूनही आॅनलाईन प्रणाली अर्धवट; मेडिकलचा कसा होणार विकास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 22:17 IST

ज्यभरातील मेडिकलमध्ये ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम’ (एचआयएमएस) राबवून रुग्णांची वैद्यकीय माहितीसह इतरही कामकाज एका ‘क्लिक’वर उपलब्ध होणार होते. परंतु ११ वर्षे उलटूनही ही प्रणाली पूर्णक्षमतेने सुरू झाली नाही.

ठळक मुद्दे११ वर्षे लोटली तरी ‘एचआयएमएस’ प्रणाली ५० टक्केच कार्यान्वित

सुमेध वाघमारेआॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यभरातील मेडिकलमध्ये ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम’ (एचआयएमएस) राबवून रुग्णांची वैद्यकीय माहितीसह इतरही कामकाज एका ‘क्लिक’वर उपलब्ध होणार होते. परंतु ११ वर्षे उलटूनही ही प्रणाली पूर्णक्षमतेने सुरू झाली नाही. सद्यस्थितीत केवळ ५० टक्केच या प्रणालीचा वापर होत आहे; असे असताना यावर खर्च झालेले कोट्यवधी रुपये व या कंपनीचे शासनाकडे थकीत असलेल्या सुमारे ३४ कोटी रुपयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रणालीचा फायदा कुणाला, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाने २००६ मध्ये ‘एचआयएमएस’ प्रणाली सुरू केली. यात राज्यातील सर्व मेडिकलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नावापासून ते रुग्णावर कोणते उपचार केले, त्याच्यावर कोणती औषधे परिणामकारक आहेत, कोणत्या औषधांची ‘अ‍ॅलर्जी’ आहे, रुग्णाच्या एक्स-रेपासून ते विविध चाचण्यांची माहिती संगणकाच्या एका ‘क्लिक’वर मिळणार होती. रु ग्ण १० वर्षांनंतरही उपचारासाठी आल्यास त्याचा पूर्वेतिहास सहज मिळू शकणार होता. याशिवाय रुग्णालयातील विविध आर्थिक व्यवहार, औषधांची खरेदी, औषधांचा साठा, उपलब्ध यंत्रसामुग्री, रुग्णांना दिला जाणारा रोजचा आहार एवढेच नव्हे तर लॉन्ड्रीला जाणाºया रोजच्या कपड्यांच्या माहितीचा समावेशही या प्रणालीत होणार होता. या प्रणालीशी राज्यातील सर्व मेडिकल कॉलेज जोडले जाणार होते. सर्व मेडिकल कॉलेजमध्ये एकवाक्यता येणार होती. विशिष्ट आजाराच्या रुग्णांची माहिती एकत्र केली जाणार असल्याने संशोधनाला वाव होता. यामुळे ‘एचआयएमएस’वर दरवर्षी तीन-चार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला. या प्रणालीची सुरुवात मुंबईच्या जेजे रुग्णालयातून झाली; नंतर पुण्याचे ससून, २००९ मध्ये नागपूर मेडिकलसह इतरही रुग्णालयांमध्ये याची सुरुवात झाली. परंतु एवढा खर्च व मोठा कालावधी लोटूनही ही प्रणाली बहुसंख्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागापुरतीच मर्यादित असल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्य