ऑनलाईन गुंठेवारी, घरबसल्या भाग नकाशा सुविधा; १४ हजारांहून अधिक अर्ज

By गणेश हुड | Published: August 3, 2023 02:39 PM2023-08-03T14:39:26+5:302023-08-03T14:43:30+5:30

नासुप्र-एनएमआरडीएची ऑनलाइन सेवा

Online Gunthewari, Home Area Map facility; More than 14 thousand applications | ऑनलाईन गुंठेवारी, घरबसल्या भाग नकाशा सुविधा; १४ हजारांहून अधिक अर्ज

ऑनलाईन गुंठेवारी, घरबसल्या भाग नकाशा सुविधा; १४ हजारांहून अधिक अर्ज

googlenewsNext

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) यांनी भाग नकाशा, गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरणाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे गरजुंना घरबसल्या तीन दिवसात भाग नकाशा मिळत आहे. गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरणाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी एनएमआरडीए यांच्याकडे मागील काही दिवसात १४ हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.

एनएमआरडीए क्षेत्रात मोठ्याप्रमणात अनधिकृत ले-आऊट आहेत. लोकांनी अशा ले -आऊटमधील भूखंड खरेदी केलेले आहेत. परंतु हे भूखंड नियमित नसल्याने भूखंडधारकांना या भूखंडाची खरेदी-विक्री, करारनामा, बँकेत गहाण पत्र करताना अडचणी येतात. याचा विचार करता एनएमआरडीने ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना घरबसल्या नियमितीकरणासाठी अर्ज करता येतो.                                                                           

गुंठेवारी अंतर्गत १४ हजार अर्ज

गुंठेवारी अंतर्गत नियमितीकरणासाठी १४ हजार ऑनलाईन अर्ज आले आहेत. ऑनलाईन अर्जाची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत होती. ती आता ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. अर्जधारकांच्या भूखंडाचे ३ महिन्यात मोजणी करून या भूखंडाचे नियमितीकरण करण्यात येईल. तसेच भाग नकाशा ऑनलाईन दिला जात असल्याची माहिती एनएमआरडीएचे अपर आयुक्त अविनाश कातडे यांनी दिली.

Web Title: Online Gunthewari, Home Area Map facility; More than 14 thousand applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.