शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कांदेव्यापाऱ्याने घेतला ओळखीचा फायदा, कपडा व्यापाऱ्याची ३० लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 21:56 IST

Nagpur News खामगाव येथील एका कांदेव्यापाऱ्याने ओळखीचा फायदा घेत नागपुरातील एका कपडा व्यापाऱ्याची ३० लाखांनी फसवणूक केली.

ठळक मुद्दे३० लाखांच्या दिल्या एका बाजूनेच छापलेल्या बनावट नोटा

नागपूर : खामगाव येथील एका कांदेव्यापाऱ्याने ओळखीचा फायदा घेत नागपुरातील एका कपडा व्यापाऱ्याची ३० लाखांनी फसवणूक केली. व्यापाऱ्याने अगोदर घेतलेले ३० लाख चुकविण्याच्या नावावर कपडा व्यापाऱ्याने सांगितलेल्या कोलकाता येथील व्यापाऱ्यास चक्क एका बाजुनेच छापल्या गेलेल्या ३० लाखांच्या बनावट नोटा दिल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोन आरोपी फरार आहेत. तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा नोेंदविण्यात आला आहे.

ऋषी मोदी (३३) यांचे इतवारीतील शहीद चौकात कापडाचे होलसेल दुकान आहे. ते नेहमी कोलकात्यातून कपडे खरेदी करायचे. त्यांची इतर व्यापारी मित्रांमार्फत गिरीश राठी (४५, खामगाव) या कांदेव्यापाऱ्याशी ओळख झाली. राठी हादेखील कोलकात्याला कांदे पाठवितो. २१ सप्टेंबर रोजी त्याने मोदी यांना फोन करून तो कोलकात्यामध्ये असल्याचे सांगितले. त्याचा मित्र कुलदीप याला २९ लाख ९४ हजार तातडीने द्यायचे आहे व परत आल्यावर मी लगेच पैसे देतो असे त्याने मोदी यांना सांगितले. मोदी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून संबंधित व्यक्तीला पैसे दिले. त्याचवेळी मोदी यांना कोलकात्यातील एका व्यापाऱ्याल ३० लाख रुपये द्यायचे होते. राठी तेथेच असल्याने त्यांनी त्याला तेथे पैसे देऊन दे असे सांगितले. राठीने संबंधित व्यापाऱ्याला दोन हजारांच्या नोटा असलेले मोठे बंडल करून पैसे दिले. व्यापाऱ्याने घरी जाऊन तपासणी केली असता दोन हजारांच्या नोटांवर एकाच बाजूने छपाई होती व सर्व नोटा बनावट होत्या. त्याने मोदी यांना या प्रकाराची माहिती दिली. मोदी यांनी लगेच राठीला विचारणा केली. मात्र त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. कुलदीप या व्यक्तीचा मोबाईल क्रमांकदेखील बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोदी यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सद्यस्थितीत दोन्ही आरोपी फरार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी