शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

नागपुरात एकतर्फी प्रेमात विद्यार्थ्याने कापला स्वत:चा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 21:36 IST

एकतर्फी प्रेमसंबंधात कुही येथील एका विद्यार्थ्याने प्रेयसीच्या समोरच ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर व हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी दुपारी दिघोरी टेलिफोन चौक येथे घडली.

ठळक मुद्देदिघोरी परिसरात खळबळ : अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकतर्फी प्रेमसंबंधात कुही येथील एका विद्यार्थ्याने प्रेयसीच्या समोरच ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर व हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी दुपारी दिघोरी टेलिफोन चौक येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. संदीप वासनिक (२२) रा. कुही असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे.संदीप हा अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी आहे. त्याचा मित्र नागपुरात राहतो. तो दोन दिवसांपूर्वी मित्राला भेटण्यासाठी नागपूरला आला होता. या प्रकरणाशी संबंधित तरुणीसुद्धा कुहीची राहणारी आहे. ती टेलिफोन चौक येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करते. आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहते. तरुणीच्या लहान भावाची संदीपसोबत मैत्री होती. त्यामुळे तो तिला ओळखत होता. काही दिवसांपासून तो तरुणीसमोर आपले प्रेम व्यक्त करीत होता. परंतु तिने त्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. नुकतीच त्या तरुणीचे लग्न निश्चित झाले. तेव्हापासून संदीप अतिशय दुखावला होता. तो सकाळी १० वाजता टेलिफोन चौकातील मेडिकल स्टोअरमध्ये आला. मिंळालेल्या माहितीनुसार संदीप त्या तरुणीला धमकावू लागला. तिने लग्न केले तर कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे तरुणी आणि मेडिकल स्टोअरमध्ये उपस्थित लोक घाबरले. काही कळण्यापूर्वीच संदीप मेडिकल स्टोअरमधून बाहेर पडला, आणि स्टोअरसमोरच त्याने ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर व हातावर चार-पाच वार केले. तरुणी आणि इतर लोक वाचवण्यासाठी धावले. त्यांनी संदीपला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने ऐकले नाही रक्तबंबाळ अवस्थेत तो एका गल्लीत पळाला. थोड्या अंतरावर जाऊन तो खाली पडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. संदीपच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याचे सांगितले जाते. नंदनवन पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे.कुणी मदत करू शकले नाहीसंदीपच्या हातात ब्लेड होती. तो ब्लेडने वार करीत, हवेत हातवारे करीत होता. त्यामुळे त्याच्या मदतीसाठी पुढे जाणे म्हणजे स्वत:ला जखमी करून घेणे होते. त्यामुळे कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. दरम्यान, नगरसेवक विजय झलके तेथून जात होते. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली तसेच संदीपला आपल्या कारने रुग्णालयात पोहोचविले. नंदनवन पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संदीपच्या कुटुंबीयांना सूचित केले. मानसिक अवस्थेतून उचलले पाऊलसंदीप हा बी.टेक. दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. संदीप मानसिकदृष्ट्या विचलित असल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या या कृत्यामुळे कुटुंबीय व मित्रसुद्धा हादरले आहेत. संदीप काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या त्रस्त होता. परंतु तो इतके गंभीर पाऊल उचलेल, असे कुणाला वाटले नाही. तो अतिशय हुशार विद्यार्थी असल्याचे सांगितले जाते.

 

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी