लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात आठपैकी एका स्त्रीला स्तनाच्या कर्करोगाचे निदान होते. परंतु यातील ७० टक्के महिला या स्टेज तीन व चारवर पोहचल्यावर उपचारासाठी येतात. परिणामी, यातील ९५ टक्के महिलांवर उपचार करणे कठीण जाते. परंतु याच कर्करोगाचे शून्य स्टेजमध्ये निदान झाल्यास सोपी व कमी खर्चिक उपचारपद्धती आहे. यामुळे याच्या जनजागृतीच्या मोहिमेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटरचे संचालक आणि सर्जिकल आॅन्कोलॉजीचे प्रमुख डॉ. अजय मेहता यांनी दिली.एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटरने स्तनांच्या कर्करोगाबाबत आॅक्टोबर महिना हा जागृती महिना मोहिमेचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी या कॅन्सर सेंटरच्या प्रमुख डॉ. सुचित्रा मेहता उपस्थित होत्या. याप्रसंगी ‘ब्रेस्ट कॅन्सर व्हॉट यू मस्ट नो’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. अमृता फडणवीस म्हणाल्या, स्तनाच्या कर्करोगामध्ये भारत तिसºया क्रमांकावर आहे. स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास पुढील धोके कमी होतात. परंतु भारतात बहुसंख्य महिलांचे उशिरा निदान होते. यामुळे याच्या जनजागृतीसाठी प्रत्येकाचा पुढाकार आवश्यक आहे. ग्रामीण भागातील महिलांची यासाठी नि:शुल्क तपासणी व उपचारासाठी प्रयत्न केले जात आहे. फेटरी, कवडस व पालघरमध्ये याची सुरुवात झाली आहे. एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटरने या रोगाच्या जनजागृतीसाठी ‘या शहराला गुलांबी रंगाने रंगवू या’ ही संकल्पना दिली आहे. कारण गुलाबी फीत ही स्तनांच्या कर्करोगाच्या जागरूकतेचे आंतरराष्टÑीय प्रतीक आहे, असेही त्या म्हणाल्या.
आठपैकी एका स्त्रीला स्तनाचा कर्करोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:27 IST
भारतात आठपैकी एका स्त्रीला स्तनाच्या कर्करोगाचे निदान होते. परंतु यातील ७० टक्के महिला या स्टेज तीन व चारवर पोहचल्यावर उपचारासाठी येतात.
आठपैकी एका स्त्रीला स्तनाचा कर्करोग
ठळक मुद्देअजय मेहता यांची माहिती : अमृता फडणवीस यांच्या हस्ते कर्करोग जनजागृती माहिमेला सुरुवात