शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-अमरावती महामार्गावरील भीषण अपघातातून वाचलेल्या मुलीनेही सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:11 IST

शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी असलेल्या इव्हाना खान या तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज शनिवारी सकाळी तिच्या निधनाने अखेरीस संपली.

ठळक मुद्देअपघातातील मृतांची संख्या ७

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी असलेल्या इव्हाना खान या तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज शनिवारी सकाळी तिच्या निधनाने अखेरीस संपली. या अपघातातील एकूण मृतांची संख्या आता ७ झाली आहे.

शुक्रवारी असा घडला होता अपघातशुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास नागपूर अमरावती महामार्गावर वाडी-वडधामन्याजवळ हा भीषण अपघात घडला. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिस्लॉप कॉलेजचे ८ विद्यार्थी निशा राजेंद्र निकम (२१), विशाल रथवानी (२१), सत्या सिंग (२०), दिव्या पकू (२१), धीरज पथाडे (२१), मैत्रेय आवळे (२२), शाहबाज जाफर अलवी (२२) आणि इव्हाना परवीन खान (वय २२) अमरावतीकडे पार्टीसाठी गेले होते. दुपारी ४.३० च्या सुमारास ते तिकडून अर्टिका कार (एमएच ४०/ एसी ९२०१) ने नागपूरकडे परत येत होते. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. धावत्या कारमध्ये ते गंमतजंमत करत येत होते. वडधामनाजवळच्या शहनाज हॉटेलसमोर अचानक भरधाव कार उभ्या कन्टेनरवर आदळली. त्यामुळे कारच्या दर्शनी भागाची पुरती मोडतोड झाली आणि कारमध्ये बसलेले निशा, विशाल, सत्या, दिव्या, तसेच धीरज हे पाच जण जागीच ठार झाले तर, मैत्रेयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयात इव्हाना हिचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. या अपघातातून बचावलेला एकमेव तरुण शाहबाज याच्यावर उपचार सुरू आहेत.या मित्रमैत्रिणींनी गाडीत बसून काढलेला एक व्हिडिओ त्यांनी कालच इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. त्यात हे सर्व हसत खेळत, गाणी म्हणत जाताना दिसत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात