शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

एक महिन्याचे वीज बिल तब्बल साडेतीन लाख रुपये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:18 IST

नागपुरातील बेसा ग्रामपंचायत अंतर्गत वसंतनगर येथील आशा-कुसुम अपार्टमेंटच्या कॉमन मीटरचे एका महिन्याचे वीजबिल तब्बल ३ लाख ३४ हजार रुपये एवढे आले आहे. या कॉमन मीटरवर एक पाण्याची मोटार आणि तीन लाईट व एक लिफ्ट इतका भार आहे. एका महिन्याचे बिल पाहून येथील गाळेधारक धास्तावले आहेत.

ठळक मुद्देविद्युत विभागाचा कारभार : नागपूरच्या आशा-कुसुम अपार्टमेंट बेसा येथील रहिवाशांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील बेसा ग्रामपंचायत अंतर्गत वसंतनगर येथील आशा-कुसुम अपार्टमेंटच्या कॉमन मीटरचे एका महिन्याचे वीजबिल तब्बल ३ लाख ३४ हजार रुपये एवढे आले आहे. या कॉमन मीटरवर एक पाण्याची मोटार आणि तीन लाईट व एक लिफ्ट इतका भार आहे. एका महिन्याचे बिल पाहून येथील गाळेधारक धास्तावले आहेत.बेसा-बेलतरोडी परिसरात वसंतनगर पिपळा रोड बेसा येथे हे अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये अंकुश एकलारे, अमोल तुपकरी, मयुर अवसरे, प्रसाद वाघ, विजय घोनमाडे, नितीन मते, सुधीर धोपे, डॉ. उमक, विनोद श्रीभाविकर, देवेन कोरडे, पंकज मोहतेकर, आदेश झा आणि सावन एकलारे असे १३ कुटुंब राहतात. या गाळेधारकांनी दिलेल्या निवेदनानुसार प्रत्येकाकडे व्यक्तिगत वीज मीटर आहे. पाण्याची मोटार आणि पार्किंगच्या लाईटसाठी एक कॉमन मीटरही याठिकाणी आहे. या मीटरचं बिल दर महिन्याला तीन ते चार हजाराच्या दरम्यान यायचं. ते सुद्धा अधिकच होते. बिल जास्त येते म्हणून गेल्या महिन्यातच नवीन मीटर लावण्यात आलं. मात्र बिलाची रक्कम कमी होण्याऐवजी ती अधिकच वाढली. सप्टेंबर महिन्याचे वीजबिल तब्बल ३ लाख ३४ हजार एवढे वाढले. त्यामुळे गाळेधारकांना धक्काच बसला. आता हे बिल कसं भरायचं असा प्रश्न या रहिवाशांना पडला आहे.अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उद्दामपणानागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार वाढलेले बिल घेऊन स्थानिक विद्युत विभागाच्या कार्यालयात गेले. तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना यासंदर्भात विचारणा केली असता ‘बिल कमी होणार नाही. तुम्ही ऊर्जामंत्र्यांना भेटला तरी चालेल’ असे उलट उत्तर मिळाले. यामुळे नागरिक अधिकच धास्तावलेले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल