कळमेश्वर : समाेरून येणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य एक जखमी झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेगली शिवारात २४ जानेवारी राेजी घडली.
राजू चिंतामण भुरसे (४३, रा. डाेरली भिंगारे, ता. कळमेश्वर) असे मृताचे नाव असून, कवडू बापूराव बारमाटे (५०, रा. पारडी देशमुख, ता. कळमेश्वर) असे जखमीचे नाव आहे. मृत राजू व कवडू बारमाटे हे दाेघेही एमएच-४०/टी-०६८३ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना घाेगली शिवारात समाेरून येणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने राजूचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला तर कवडू बारमाटे हे जखमी झाले. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक मुंडे करीत आहेत.