शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनतर्फे हॉकर्सविरोधात एक दिवसाचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:21 IST

सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनच्या सर्व दुकानदारांनी बुधवारी हॉकर्सविरोधात एकजुटतेचे प्रदर्शन करीत हॉकर्सना दुकानासमोर अवैध व्यवसाय करण्यास मनाई करून हुसकावून लावले. यापुढे अवैध हॉकर्सना दुकानासमोर अतिक्रमण करू न देण्याचा निर्धार सीताबर्डी मेनरोड येथील दुकानदारांनी बंददरम्यान केला.

ठळक मुद्देहॉकर्सच्या मनमानीने दुकानदार त्रस्त : ७०० पेक्षा जास्त अवैध हॉकर्स

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनच्या सर्व दुकानदारांनी बुधवारी हॉकर्सविरोधात एकजुटतेचे प्रदर्शन करीत हॉकर्सना दुकानासमोर अवैध व्यवसाय करण्यास मनाई करून हुसकावून लावले. यापुढे अवैध हॉकर्सना दुकानासमोर अतिक्रमण करू न देण्याचा निर्धार सीताबर्डी मेनरोड येथील दुकानदारांनी बंददरम्यान केला.

दुकानदार हुसेन अजानी यांनी सांगितले, सीताबर्डी मेनरोडवर ७०० पेक्षा जास्त अवैध हॉकर्स अरेरावी करून व्यवसाय करतात. मंगळवारी रात्री हॉकर्सनी अवैधरित्या व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील मुख्य रस्त्यावर स्वत:च्या व्यवसायासाठी चार बाय चार आकाराचे चुन्याने डब्बे आखले. त्यावरून रात्रीच दुकानदार आणि हॉकर्समध्ये तणाव निर्माण झाला. मेनरोडवरील दुकाने बंद करण्याचा हॉकर्सचा डाव व्यापाऱ्यांनी हाणून पाडताना बुधवारी सकाळी सर्वच दुकानदारांनीआपापली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. दुकानदारांच्या कृतीला न जुमानता हॉकर्सनी मोर्चा काढून दुकानदारांविरुद्ध नारेबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुकानदारांनीही हॉकर्सला विरोध केला.अजानी म्हणाले, पूर्वी १०८ वैध हॉकर्स होते. ही संख्या ७०० वर गेली असून दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. हॉकर्समुळे आमच्यावर दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. लहानसहान गोष्टीवरून हॉकर्स अरेरावीवर उतरतात आणि थेट धमकी देतात. यापूर्वी सीताबर्डी पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी केल्या आहेत. बुधवारी पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी मध्यस्थी करून हॉकर्सना पिटाळून लावले. या संदर्भात सीताबर्डीच्या पोलीस निरीक्षकांनीही मध्यस्थी केली. यापुढे हॉकर्सची मनमानी व अरेरावी चालू देणार नाही आणि एकजुटीने त्यांचा विरोध करू, असे अजानी यांनी सांगितले.दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल
सीताबर्डी पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हॉकर गोपीचंद आंभुरे, विनायक तिरपुडे, दुर्गाप्रसाद केवलरामानी, संदीप साहू, हेमंत गोतमाांगे, नरेश ढगे,राजेश चंदू अग्रवाल, आतिक अंसारी आणि त्यांचे साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच व्यापाºयांमध्ये हुसेन, किसन अग्रवाल, प्रदीप गुप्ता, विजय अग्रवल, प्रजोत देशपांडे, किसन मांगवानी, पराग ठक्कर, मंसुर अंसारी, नारायण चौरसिया, अर्जीन भोजवानी आणि इतर लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. व्यापारी गुरुवारी यासंदर्भात पोलीस आणि मनपा आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, नेत्यांच्या माध्यमातून दबाव टाकून हॉकर्सना मदत केली जात आहे.

टॅग्स :Sitabuldi square Nagpurसीताबर्डी चौकagitationआंदोलन