शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र गोडबोले यांना एक दिवसाचा ‘पीसीआर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:40 IST

उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयातील आढावा बैठकीत एनटीपीसीच्या अधिकाºयांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले आणि धामणगाव(ता. मौदा)चे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गोरले यांना मौदा येथील न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालय परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी गर्दी केल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यांना घटनेच्या आठ दिवसानंतर रविवारी (दि. ५) सायंकाळी नागपूर शहरातून अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देएनटीपीसी अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरण : न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयातील आढावा बैठकीत एनटीपीसीच्या अधिकाºयांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले आणि धामणगाव(ता. मौदा)चे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गोरले यांना मौदा येथील न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालय परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी गर्दी केल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यांना घटनेच्या आठ दिवसानंतर रविवारी (दि. ५) सायंकाळी नागपूर शहरातून अटक करण्यात आली होती.आढावा बैठकीत देवेंद्र गोडबोले व जितेंद्र गोरले यांनी एनटीपीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक (मनुष्यबळ) राजकुमार प्रजापती, जनसंपर्क अधिकारी समीरकुमार चिमण लाल यांच्याशी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवरून वाद घालत प्रजापती यांना मारहाण केली होती. राजकुमार प्रजापती त्यांच्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. दरम्यान, दोघांनाही रविवारी रात्री नागपूर शहरात अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी (दि. ६) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मौदा पोलीस ठाण्यात आणि त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास मौदा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. पी. पांडे यांच्या न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने अंदाजे दीड तास दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेत देवेंद्र गोडबोले व जितेंद्र गोरले यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.परिणामी, या दोघांनाही मंगळवारी (दि. ७) दुपारी मौदा येथील न्यायालयात हजर केले जाईल. त्यावेळी दोघांचेही जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जामिनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, नागरिकांनी सकाळी १० वाजतापासून न्यायालय परिसरात यायला सुरुवात केली होती. दुपारपर्यंत अंदाजे १६०० नागरिक गोळा झाले होते. त्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह तालुक्यातील सरपंच व महिलांचाही समावेश होता.न्यायालय परिसरात जमावन्यायालय परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. मात्र, कुणीही घोषणाबाजी किंवा नारेबाजी केली नाही. सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास हा जमाव देवेंद्र गोडबोले यांच्या मौदास्थित जनसंपर्क कार्यालयासमोर गेला. तिथे माजी आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य भारती गोडबोले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश धोपटे, वर्धराज पिल्ले यांनी नागरिकांना संबोधित केले.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर