लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक ७२०१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आतापर्यंतची ही सर्वाधिक मोठी संख्या आहे. दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी ६४८९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. नागपुरात रविवारी कोरोनाने ६३ जणांचा मृत्यू झाला. यासोबतच एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २,७८,५५६ इतकी झाली असून, एकूण मृतांची संख्या ५७६९ वर पोहोचली आहे. रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक २६,००७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
रविवारी आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील ४६४१, ग्रामीणमधील २५५३ आणि जिल्ह्याबाहेरचे ७ जण आहेत. मृतांमध्ये शहरातील ३६, ग्रामीणचे २० आणि जिल्ह्याबाहेरचे ७ जण आहेत. रविवारी ३२४० पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले. यासोबतच आतापर्यंत २,१७,३१३ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नागपुरातील रिकव्हरी रेट प्रचंड घसरला असून तो ७८.०१ टक्क्यांवर आला आहे. रविवारी बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी शहरातील २३०९ आणि ग्रामीणचे ९३१ जण आहेत. तपासण्यात आलेल्या नमुन्यांत शहरातील १४,९०६, ग्रमीणचे ११,१०१ आहेत. आतापर्यंत एकूण १८ लाख २७ हजार २४४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
चौकट
५५,४७४ सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात ५५,४७४ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ३४,४८५ शहरातील आणि १८,९८९ ग्रामीण भागातील आहेत. १३,६२६ विविध शासकीय व खासगी रुग्णालयांत भरती आहेत, तर ४१,८४८ होम आयसोलेशनमध्ये आहेत. मेडिकलमध्ये ७७०, मेयोमध्ये ५४५, एम्समध्ये ८५, इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात ८४, आयसोलेशन रुग्णालयात ३८ रुग्ण भरती आहेत. शासकीय रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालये सुद्धा हाऊसफुल्ल झाली आहेत.
बॉक्स
ॲक्टिव्ह - ६६,४७४
बरे झालेले २,१७,३१३
मृत ५७६९