शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवाडा कोळसा खदान पतसंस्थेत एक कोटीचा गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:22 IST

सिल्लेवाडा (ता. सावनेर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोळसा खदान मागासवर्गीय कामगार सहकारी पतसंस्थेत संचालकांनी केलेल्या १ कोटी ४ लाख ८२ हजार ४९० रुपयांच्या घोटाळाप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी पतसंस्थेचे सचिव तथा मुख्य आरोपी शरदचंद्र दास, रा. वानाडोंगरी, ता. हिंगणा यांना अटक केली. या प्रकरणातील आरोपींची संख्या आठ असून, सर्व जण पतसंस्थेचे संचालक आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देसचिवास अटक : अन्य आठ संचालकांचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिल्लेवाडा (ता. सावनेर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोळसा खदान मागासवर्गीय कामगार सहकारी पतसंस्थेत संचालकांनी केलेल्या १ कोटी ४ लाख ८२ हजार ४९० रुपयांच्या घोटाळाप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी पतसंस्थेचे सचिव तथा मुख्य आरोपी शरदचंद्र दास, रा. वानाडोंगरी, ता. हिंगणा यांना अटक केली. या प्रकरणातील आरोपींची संख्या आठ असून, सर्व जण पतसंस्थेचे संचालक आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.या पतसंस्थेची स्थापना ४ एप्रिल २००१ रोजी करण्यात आली असून, २००८ पासून पतसंस्थेने मुदत ठेव, आवर्ती ठेव, शेअरच्या रूपात ठेवी स्वीकारायला सुरुवात केली. दरम्यान, ठेवींची मुदत संपल्याने खातेदारांनी रकमेची मागणी केली. त्यावर ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने ठेवीदारांनी सहनिबंधक व जिल्हा निबंधकांकडे तक्रार केली. पतसंस्थेच्या संचालकांनी चौकशी अधिकाऱ्यांनाही सुरुवातीला सहकार्य केले नाही.घोटाळा केल्याचे स्पष्ट होताच चौकशी अधिकारी प्रशांत बघेल यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याअनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. शरदचंद्र दास हे वेकोलिच्या भानेगाव येथील कोळसा खाणीत सुपरवायझरपदी कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते सिल्लेवाडा खाणीत कार्यरत होते. ते ठेवीदारांना नेहमीच पैसे मागायचे, असेही काहींनी सांगितले. ते पूर्वी सिल्लेवाडा येथील वेकोलि कॉलनीत राहायचे. दोन वषा्रंपूर्वी त्यांना वानाडोंगरी येथे फ्लॅट विकत घेतला असून, तिथे राहायला गेले. विशेष म्हणजे, या प्रकरणातील सर्व आरोपी हे पतसंस्थेचे संचालक व वेकोलिचे कर्मचारी आहेत. त्या सर्वांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी तथा ठाणेदार अशोक साखरकर यांनी सांगितले.पाच दिवसांची पोलीस कोठडीआरोपी शरदचंद्र दास यांना शनिवारी सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोकाटे यांच्या न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची अर्थात ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी युक्तीवादादरम्यान सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. या काळात त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करणे, कागदपत्र व रेकॉर्ड जप्त करणे, घोटाळ्यात लिप्त असलेल्या संचालकांसह इतरांची नावे माहिती करून त्यांना अटक करणे, त्या रकमेची विल्हेवाट कशी, कुठे व कधी लावली याबाबत पोलीस माहिती मिळविणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी