शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

एक फुलपाखरू १० झाडांना देते नवजीवन; सप्टेंबर ‘बटरफ्लाय मंथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 07:00 IST

एक फुलपाखरू त्याच्या आयुष्यात अनेक झाडांवर भ्रमण करीत असते. पण या छोट्याशा आयुष्यात कमीत कमी १० फुलझाडे किंवा फळझाडांचे पुन:रोपण ते परागीकरणातून करीत असते.

ठळक मुद्दे परागीकरणातून जैवविविधतेचे संतुलनअल्पायुष्यात शेकडो फुलझाडांचा करतात प्रसार 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गाने मुक्तछंदाने रंगांची उधळण करून सुंदर रूप प्रदान केलेले आणि या फुलांवरून त्या फुलांवर सैरभैर फिरणारे फुलपाखरू पाहणाऱ्यांना आकर्षित करतेच. रंगीबेरंगी फुलपाखराचे आकर्षक रूप नक्कीच मनाला भुरळ पाडते. पण मोहक दिसणे हीच त्यांची ओळख नाही. आपल्या अल्पायुषी जीवनात परागीकरणाचे बहुमूल्य काम फुलपाखरे करतात. एक फुलपाखरू त्याच्या आयुष्यात अनेक झाडांवर भ्रमण करीत असते. पण या छोट्याशा आयुष्यात कमीत कमी १० फुलझाडे किंवा फळझाडांचे पुन:रोपण ते परागीकरणातून करीत असते.

फुलपाखरू अभ्यासक आणि महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. जैवविविधता आणि पर्यावरण संतुलनात ते महत्त्वाची भूमिका पार पाडताहेत. परागीकरण ही शास्त्रीय व्याख्या आहे. पक्षी, कीटक आणि फुलपाखरे यांच्याद्वारे ही क्रिया पार पडते. एका फुलांवरून दुसºया फुलांवर भ्रमण करताना हे निसर्गदूत अजाणतेपणे त्या वृक्षाचे बीजांश वाहून इतर ठिकाणी वाहून नेतात आणि त्यातून नवीन झाडाचा जन्म होतो. खरेतर जंगलातील लाखो झाडे कुणी वृक्षारोपण केल्याने झाली नाहीत तर याच परागीकरणाच्या क्रियेतून झाली आहेत. यामुळे या इवल्याशा जीवाचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.

आज जगभरात ज्ञात असलेल्या कीटकांची संख्या १ लाख ५० हजार इतकी असून त्यापैकी १७,८२४ इतकी फुलपाखरे जगात आहेत. अलीकडील आकडेवारीनुसार भारतात १,५०५ इतकी फुलपाखरे आहेत. हीच संख्या महाराष्ट्रात २७७ च्या घरात आहे. विदर्भात १८५ प्रजाती तर मेळघाटात एकूण १२७ प्रकारची फुलपाखरे आढळतात.

मेळघाट, ताडोबा, पेंच व इतर जंगल परिसरात आपण निरीक्षण केल्यास २० ते २५ फुलपाखरांच्या प्रजाती आपल्याला एकाच भेटीत नक्कीच पाहायला मिळतील. फुलपाखरे ही अन्नसाखळीत महत्त्वाची असल्यामुळे त्यांचे अस्तित्व हे स्वच्छ पर्यावरणाचे प्रतीक आहे. सातपुडा व सह्याद्री व त्यालगतचा परिसर फुलपाखरांच्या बाबतीत समृद्ध आहे. आपण अनेक दुर्मिळ तशीच इतरही फुलपाखरे तिथे मोठ्या संख्येने पाहू शकतो. तेथे फुलपाखरांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याने भारतात पहिल्यांदाच ‘निलवंत’ याला आपले राज्य फुलपाखरू जाहीर केले आहे.

फुलपाखरांचा मुख्य आधार हा वनस्पतीच असतात. त्याच वनस्पतीवर ते आपली गुजराण करतात व त्यांच्या उगवणाºया फुलातील मधुरस घेतात. हे त्यांचे मुख्य ऊर्जास्त्रोत आहेत. मात्र फुलातील परागीकरण करताना ते त्या झाडाचे बीजांश दुसरीकडे रोपण करण्याचे महत्त्वाचे काम करतात. हे जैवविविधता संतुळनाचे अनोखे उदाहरण आहे आणि यासाठीच कदाचित सुंदर, मोहक रूपाच्या फुलपाखरांची निर्मिती झाली आहे.सप्टेंबर ‘बटरफ्लाय मंथ’साधारणत: सप्टेंबर महिन्यात फुलपाखरांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होते आणि हाच काळ अनुकूल मानला जातो. म्हणून आपल्या देशात हा महिना ‘बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात फुलपाखरांची गणना आणि संवर्धनाच्या जनजागृतीबाबत अनेक कार्यक्रम राबविले जातात. यात महाराष्ट्र अग्रेसर आहे, ही अभिमानाची बाब आहे.- यादव तरटे पाटील, सदस्य, महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळ

टॅग्स :wildlifeवन्यजीव