शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

१३० कोटींची जुनी देणी मनपाच्या नव्या अर्थसंकल्पात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:22 IST

स्थायी समितीने महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. प्रत्यक्षात गेल्या आर्थिक वर्षात २०१७.७५ कोटींचा महसूल जमा झाला. अर्थसंकल्पात गृहित धरण्यात आलेला महसूल व प्राप्त उत्पन्न यात मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे कंत्राटदारांची थकीत देणी, कर्मचाऱ्यांना घेणे असलेली थकबाकी व अन्य देणी अशी ७० ते ८० कोटींची जुनी देणी आहे, तर ६० कोटीहून अधिक बांधिल खर्च देणे आहे. या जुन्या रकमेचा पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात समावेश केला जाणार आहे.

ठळक मुद्दे७० कोटींची बिले व ६० कोटींच्या बांधिल खर्चाचा समावेशप्रस्तावित अर्थसंकल्पाचा तीन दिवस आढावा

लोकमत न्यूज नेवटर्कनागपूर : स्थायी समितीने महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. प्रत्यक्षात गेल्या आर्थिक वर्षात २०१७.७५ कोटींचा महसूल जमा झाला. अर्थसंकल्पात गृहित धरण्यात आलेला महसूल व प्राप्त उत्पन्न यात मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे कंत्राटदारांची थकीत देणी, कर्मचाऱ्यांना घेणे असलेली थकबाकी व अन्य देणी अशी ७० ते ८० कोटींची जुनी देणी आहे, तर ६० कोटीहून अधिक बांधिल खर्च देणे आहे. या जुन्या रकमेचा पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात समावेश केला जाणार आहे.अपेक्षित महसूल जमा न झाल्याने आर्थिक संकटामुळे महापालिकेला ३१ मार्च २०१९ पूर्वी कंत्राटदारांची बिले देणे शक्य झाले नाही. ती परत पाठविण्यात आली. तसेच जानेवारी ते मार्च २०१९ दरम्यानच्या बिलाची रक्कम दिलेली नाही. ही देणी अर्थसंकल्पात समायोजित केली जाणार आहे.२०१९-२० या वर्षाच्या प्रस्तावित अर्थसंकल्पाचे नियोजन व आढावा घेतल्यानंतर जुनी देणी व अखर्चित बांधिल खर्चाचा प्रत्यक्ष अंदाज येईल. मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भातील आढावा बैठक होत आहे. तीन दिवसात विभागवार व झोननिहाय आढावा घेतला जाणार आहे. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त अभिजित बांगर, सभापती, विभागाचे अधिकारी व स्थायी समितीचे सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत. विभागवार प्रलंबित कामे, लागणारा खर्च, झालेले उत्पन्न व संभाव्य उत्पन्नवाढीसाठी करण्यात आलेले प्रयत्न, याचा आढावा घेतला जाणार आहे.२०१७-१८ या वर्षाचा २,२७१ कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. प्रत्यक्षात १७०० कोटी जमा झाले. तर २०१८-१९ या वर्षाचा २९४६ कोटींचा अर्थसंकल्प असताना २०१७.७५ कोटी जमा झाले. मागील काही वर्षांपासून महापालिकेत दरवर्षी वाढीव अर्थसंकल्पाची प्रथा निर्माण झाली आहे. यामुळे जुनी देणी व उपलब्ध न झालेला बांधिल निधी पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात समायोजित करावा लागतो.मंगळवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या  बैठकीत झोननिहाय आढावा घेतला जाणार आहे. यात झोनमधील मंजूर परंतु निधी उपलब्ध न झालेली कामे, नगरसेवकांनी प्रस्तावित केलेली परंतु प्रलंबित कामे याचा आढावा घेतला जाणार आहे. आवश्यक व अपूर्ण कामांसाठी पुढील अर्थसंकल्पात प्राधान्याने निधी उपलब्ध करावा लागणार आहे. बुधवारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग,स्थावर विभाग, कर, नगररचना आदी विभाग तर गुरुवारी वित्त, जलप्रदाय, उद्यान, विद्युत व अन्य विभागाचा आढावा घेतला जाणार आहे. कार्यादेश झाले पण निधी नाहीअर्थसंकल्पातील तरतुदीनुसार स्थायी समितीच्या मंजुरीनंतर कार्यादेश देण्यात आले. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने  निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे कामाला प्रत्यक्ष सुरुवात करता आलेली नाही. अशी कामे नवीन अर्थसंकल्पात समाविष्ट केली जाणार आहेत. नगरसेवकांकडून प्रस्ताव मागविणारगेल्या वर्षात नगरसेवकांनी प्रभागातील विकास क ामांचे प्रस्ताव दिले होते. प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. मात्र निधी अभावी कामे सुरू झालेली नाहीत. अशा प्रलंबित प्रस्तावांचा पुढील अर्थसंकल्पात समावेश केला जाणार आहे. नगरसेवकांकडून असे प्रस्ताव मागविले जाणार आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प