शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कामाचे ओझे आहे म्हणून जुने खटले थांबवून ठेवू शकत नाही; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 4, 2025 08:27 IST

High Court News: भारतीय राज्यघटनेने नागरिकांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार बहाल केला आहे. फौजदारी प्रकरणांमधील आरोपींनाही हा अधिकार आहे. त्यामुळे आरोपींविरुद्धचे खटले वेगात निकाली काढणे आवश्यक आहे.

- राकेश घानोडेनागपूर -  भारतीय राज्यघटनेने नागरिकांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार बहाल केला आहे. फौजदारी प्रकरणांमधील आरोपींनाही हा अधिकार आहे. त्यामुळे आरोपींविरुद्धचे खटले वेगात निकाली काढणे आवश्यक आहे. न्यायालयावर कामाचे खूप जास्त ओझे आहे म्हणून जुन्या खटल्यांवरील कार्यवाही थांबवून ठेवली जाऊ शकत नाही. न्यायालयाने या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका जामीन प्रकरणावरील निर्णयात नमूद केले.

आरोपीलाही अधिकारया प्रकरणातील आरोपीला ७ जून २०१९ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता. त्याच्याविरुद्धच्या खटल्यामध्ये काहीच प्रगती झाली नाही. त्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून जामीन मागितला होता.त्यावरील सुनावणीच्या वेळी आरोपीचे वकील ॲड. समीर सोनवणे यांनी आरोपीच्या मूलभूत अधिकाराकडे न्यायालयाचे लक्ष वेधून खटला निकाली निघण्यासाठी खूप विलंब होत असल्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी केली. 

सत्र न्यायाधीशांना समज या आरोपीविरुद्धचा खटला सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. परिणामी, उच्च न्यायालयाने संबंधित सत्र न्यायाधीशांना खटल्यासंदर्भात अहवाल मागितला असता त्यांनी कामाच्या ओझ्यामुळे या खटल्यावरील कार्यवाहीला अद्याप सुरुवात करता आली नाही, अशी माहिती दिली.उच्च न्यायालयाने ही बाब लक्षात घेता संबंधित निरीक्षण नोंदवून सत्र न्यायाधीशांना त्यांचे स्पष्टीकरण स्वीकारले जाऊ शकत नाही, अशी समज दिली, तसेच आरोपीला विविध अटींसह जामीन मंजूर केला.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर