शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वृद्ध दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:06 IST

तीन मुली आणि एक मुलगा असूनही मानसिक अथवा कौटुंबिक आधारापासून वंचित असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ही करुणाजनक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली.

ठळक मुद्देकळमन्यातील घटना : परिसरात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तीन मुली आणि एक मुलगा असूनही मानसिक अथवा कौटुंबिक आधारापासून वंचित असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ही करुणाजनक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली.बुधरामजी रामाजी कटरे (वय ७०) आणि रामीबाई बुधरामजी कटरे (वय ६५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. ते कळमन्यातील ओमसाईनगरात राहत होते. आज सकाळी ६ च्या सुमारास ते फेस गाळत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मेयोतील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.फिर्यादी जितेंद्र बुधरामजी कटरे (वय ३५, रा. इंदिरानगर, निमखेडा मौदा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.यासंबंधाने कळमना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधरामजीने अनेक वर्षांपूर्वी दुसरा घरठाव केल्याने तीन मुली आणि एक मुलगा असूनही ते कळमन्यात दुसरी पत्नी रामीबाईसोबत निराधार जीवन जगत होते. छोटेसे किराणा दुकानही चालत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक अवस्थाही खराब झाली होती. जगण्याचा आधार नसल्यामुळे शेवटी या वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर