शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ओलाचे इलेक्ट्रीक कार चालक संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:41 IST

नागपूर इलेक्ट्रीक ओला पार्टनर ग्रुपच्या नेतृत्वात सर्व इलेक्ट्रीक कारच्या चालकांनी चार दिवसांपासून संप पुकारला आहे. कार चालकांचे म्हणणे आहे की, आम्हाला अडीच ते तीन हजार रुपयांचा व्यवसाय देत नसेल तर एक हजार रुपये किराया कमी करून ५०० रुपये करावा.

ठळक मुद्देअडीच ते तीन हजाराचा मिळावा व्यवसाय

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी नागपूरात ओला कॅबतर्फे इलेक्ट्रीक कार सुरू करण्यात आल्या. १५००० रुपयांचे डिपॉझिट घेऊन १ हजार रुपये रोज भाड्यावर या कार देण्यात आल्या. या कार चालकांना रोज मिळणाऱ्या व्यवसायातून १ हजार रुपये ओला व्यवस्थापनाला व ६०० ते ७०० रुपये कार चार्जिंग करण्यासाठी द्यावे लागतात. असे असतानाही १२ तास ऑनलाईन राहुनही दीड ते दोन हजार रुपयांचा व्यवसाय मिळतो. हे कार चालकांना परवडणारे नसल्याने, त्यांनी ओला व्यवस्थापनाकडे अडीच ते तीन हजाराचा व्यवसाय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या मागणीला व्यवस्थापनाने दुजोरा न दिल्याने नागपूर इलेक्ट्रीक ओला पार्टनर ग्रुपच्या नेतृत्वात सर्व इलेक्ट्रीक कारच्या चालकांनी चार दिवसांपासून संप पुकारला आहे. कार चालकांचे म्हणणे आहे की, आम्हाला अडीच ते तीन हजार रुपयांचा व्यवसाय देत नसेल तर एक हजार रुपये किराया कमी करून ५०० रुपये करावा. बारा तास ऑनलाईन राहून दोन हजार रुपयांचा व्यवसाय मिळाल्यानंतर १७०० रुपये आम्हाला कंपनीला द्यावे लागतात. हे आम्हाला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे ओला व्यवस्थापन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत संप कायम राहिल, असा इशारा कार चालकांनी दिला आहे. शहरात जवळपास ओलाच्या १०० इलेक्ट्रीक कार धावत आहे.

टॅग्स :OlaओलाElectric Carइलेक्ट्रिक कारStrikeसंप