शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी तपासली रेल्वेगाड्यातील भोजनाची गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 22:50 IST

बुधवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील भोजनाची गुणवत्ता तपासण्यात आली.

ठळक मुद्देस्वच्छ भोजन अभियान : पेंट्रीकारमधील कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेची पाहणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. पंधरवड्यात बुधवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील भोजनाची गुणवत्ता तपासण्यात आली.रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छ भोजन अभियानांतर्गत पेंट्रीकार, बेस किचन, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, कॅन्टीनची बारकाईने पाहणी करून भोजनाची गुणवत्ता तपासली. आमलाचे सहायक विभागीय अभियंता वाय. एस. राघव यांनी १२६१६ जीटी एक्स्प्रेसची पाहणी केली. नागपूर रेल्वेस्थानकावर मुख्य आरोग्य निरीक्षक समीर चहांदे, मुख्य खानपान निरीक्षक रामबाबू, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रवीण रोकडे यांनी २२६९१ राजधानी एक्स्प्रेसच्या पेंट्रीकारचे निरीक्षण केले. यात खाद्यपदार्थांचे भाव, अग्निशमन यंत्र, डस्टबिन, व्हेंडरचे आरोग्य प्रमाणपत्र, पोलीस तपासणी प्रमाणपत्र आदींची पाहणी करण्यात आली. यावेळी स्टेशन संचालक दिनेश नागदेवे उपस्थित होते. रेल्वेगाड्यातील भोजनाबाबत प्रवाशांकडून माहिती जाणून घेण्यात आली. प्रवाशांकडून ते समाधानी असल्याबाबतचे फॉर्म भरून घेण्यात आले. त्यानंतर अजनी रेल्वे कॉलनीची पाहणी करण्यात आली.प्रवाशांना खाद्यपदार्थांचे बिल देण्याची सूचनादक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. रमणा यांनी सहायक वाणिज्य व्यवस्थापक जितेंद्र तिवारी आणि अधिकाऱ्यांसोबत आझादहिंद एक्स्प्रेसच्या पेंट्रीकारची पाहणी केली. पेंट्रीकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे हातमोजे, मास्क आहेत की नाही, त्यांचे डोके झाकलेले आहे काय, हातापायाची नखे कापली की नाही, ते वैद्यकीयदृष्ट्या निरोगी आहेत की नाही, त्यांचे ओळखपत्र आदी बाबी तपासण्यात आल्या. सहायक वाणिज्य व्यवस्थापक अनुराग सिंह यांनी प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ पुरविण्याच्या सूचना केल्या. यावेळी प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी प्रवाशांना प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :railwayरेल्वेfoodअन्न