शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

बैठका, व्हीसीमुळे नागपुरातील अधिकारी वैतागले : पाच वर्ष बैठकीतच गेल्याची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:33 AM

गेल्या पाच वर्षात सरकारचे मंत्री, सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विविध विभागाचे आयुक्त यांनी मॅराथॉन बैठका झाल्याने पाच वर्ष बैठकीतच गेल्याची भावना नागपुरातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना आचारसंहितेची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रधानमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत होणाऱ्या बैठका, घेतले जाणारे आढावे, त्याकरिता करावी लागणारी तयारी, मंत्रालयाचे दौरे, वारंवार होणाऱ्या व्हीसी यामुळे शासकीय अधिकारी वैतागले होते. या बैठकांची फलश्रुती काहीच नसल्याने बैठका कराव्या की काम हेच अधिकाऱ्यांना समजेनासे झाले होते. गेल्या पाच वर्षात सरकारचे मंत्री, सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विविध विभागाचे आयुक्त यांनी मॅराथॉन बैठका झाल्याने पाच वर्ष बैठकीतच गेल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कधी आचारसंहिता लागते आणि कधी त्यातून आमची सुटका होते अशी भावना अधिकाऱ्यांची झाली आहे.अधिकाऱ्यांच्या मते पाच वर्षाच्या सरकारच्या कार्यकाळात बैठकींचा प्रकार भरपूर वाढला. आकडेवारी गोळा करण्यात अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा तर उपद्रव होता. पण तुलनेत मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या पदांकडे सरकारचे लक्ष गेले नाही. विभाग प्रमुखांच्या मुंबईच्या वाºया, एका महिन्यात २० बैठका कराव्या लागत होत्या.मुख्यमंत्र्यांची बैठक असेल तर संबंधित विभाग प्रमुखाला माहिती गोळा करणे, सीईओ आणि जिल्हाधिकारी यांची पूर्वतयारीची बैठक, त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून आढावा, त्यानंतर सचिवांकडून घेण्यात येणारा आढावा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर परत बैठक अशा बैठकांचे सत्र होत असतात. यात लहान कर्मचाऱ्यांपासून विभाग प्रमुखांपर्यंत आकडेवारी गोळा करण्यात सर्वच व्यस्त होऊन जातात. त्यामुळे नेहमीचे काम करायला, दौरे करायला विभाग प्रमुखांना वेळच मिळाला नाही.

नागपुरातील अधिकारी तर जास्तच व्यस्तइतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपुरातील अधिकारी जास्तच व्यस्त असायचे. मुख्यमंत्र्यांचे, पालकमंत्र्यांचे दौरे बैठका सातत्याने होत होत्या. सचिव, मंत्रालयीन अधिकाऱ्यांची ये-जा सातत्याने असायची. ते कधीही बैठका बोलवायचे. रात्री उशिरापर्यंत अधिकारी काम करायचे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने नागपूरच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच प्रेशर होते. सोबतच तणाव व भीतीत त्यांची पाच वर्षे गेली.

मिटिंग म्हटली की आता चीड येतेअधिकारी म्हणतात की रिझल्ट पाहिजे असेल तर आम्हाला मोकळीक द्यायला हवी. आॅनलाईन झाले असताना, एवढ्या बैठका आणि व्हीसीची गरज नव्हती. या बैठकांचा, व्हीसीचा आम्हाला वैताग आला आहे. आता मिटिंग म्हटली की चीड येत असल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Governmentसरकार