शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

बनावट इन्स्टाग्रामवर शिक्षिकेचे आक्षेपार्ह फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 11:04 IST

Teacher Nagpur News Instagram शाळेत मनासारखा विषय मिळण्यात शिक्षिका अडसर ठरत असल्याने एका विद्यार्थ्याने आपला रोष व्यक्त करण्यासाठी बनावट इन्स्टाग्राम आयडी बनविली. त्यावर शिक्षिकेचे आक्षेपार्ह फोटो अपलोड केले.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलाचे कृत्य

जगदीश जोशी

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : शाळेत मनासारखा विषय मिळण्यात शिक्षिका अडसर ठरत असल्याने एका विद्यार्थ्याने आपला रोष व्यक्त करण्यासाठी बनावट इन्स्टाग्राम आयडी बनविली. त्यावर शिक्षिकेचे आक्षेपार्ह फोटो अपलोड केले. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा १६ वर्षीय विद्यार्थी राहतो. सुखवस्तू कुटुंबातील या विद्यार्थ्याने दहावीत गणित विषयात कमजोर असूनही तो विषय मिळावा म्हणून हट्ट धरला होता. शाळेतील एका शिक्षिकेचा सूर या विषयाच्या संबंधाने नकारात्मक होता. मात्र त्याचा हट्ट कायम होता. ते पाहून त्याच्या पालकांना मुख्याध्यापकांनी शाळेत बोलविले. त्याच्या हट्टामुळे परीक्षेवर परिणाम होईल, अशी कल्पना शिक्षकांनी पालकांना दिली. मात्र, मुलगा नाराज होऊ नये म्हणून पालकांनी शिक्षक, मुख्याध्यापकांचा सल्ला धुडकावला. आईवडिलांच्या समर्थनामुळे मुलाचे मनोबल चांगलेच वाढले. तो नकारात्मक सूर आळवणाऱ्या शिक्षिकेला धडा शिकविण्याच्या कामी लागला. त्याने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून त्यावर एका आक्षेपार्ह फोटोवर शिक्षिकेचा चेहरा जोडून तो व्हायरल केला. ते कळाल्यानंतर शिक्षिकेने नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण सायबर सेलकडे पाठविले. सायबर सेलने तात्काळ हे अकाऊंट ब्लॉक केले. त्यामुळे तो विद्यार्थी चरफडला. त्याने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्या वेळेलाही पुन्हा बनावट अकाऊंट तयार करून तसाच प्रकार केला. विशेष म्हणजे, हे कुकृत्य करण्यासाठी तो तासन् तास इंटरनेटवर राहत होता. आईवडिलांना ऑनलाईन क्लासचे कारण सांगत असल्याने त्याचे हे कृत्य लक्षात येत नव्हते. दोन अकाऊंट ब्लॉक केल्यानंतर त्याने पुन्हा तिसऱ्यांदा तसाच प्रकार केला. यावेळी मात्र त्याची चूक सायबर शाखेच्या लक्षात आली आणि पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले. एकुलत्या एक मुलाचे हे कुकृत्य समोर आल्यानंतर आईवडिलांना लज्जेने मान खाली घालण्याची वेळ आली.

शाळा-महाविद्यालये बंद असल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाईन क्लासच्या बहाण्याने भलत्याच कामात गुंतल्याचे वास्तव आहे. असे प्रकार उघड होऊनही बदनामीच्या धाकाने पीडित पोलिसांकडे पोहचत नाहीत. त्यामुळे पाल्यावर लक्ष ठेवण्याची पालकांवरची जबाबदारी वाढली आहे.

 

टॅग्स :Instagramइन्स्टाग्राम