शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१२८ शाळांमध्ये उघड्यावर शिजतोय पोषण आहार! दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?

By गणेश हुड | Updated: May 20, 2023 16:45 IST

Nagpur News गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना शासनाकडूनच ‘प्रि-फेब्रीकेटेड किचन शेड’तयार करून दिले होते. परंतु यातील तब्बल १२८ शाळांमधील किचन शेड नादुरुस्त झाले आहे.  त्यामुळे या शाळांत पोषण आहार उघड्यावर शिजवावा लागत आहे. 

गणेश हूड नागपूर :    शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार, स्वच्छ ठिकाणी तयार करण्यात यावा. हा आहार तयार करताना स्वयंपाक घरात स्वच्छता बाळगावी असे शासनाचे निर्देश आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना शासनाकडूनच ‘प्रि-फेब्रीकेटेड किचन शेड’तयार करून दिले होते. परंतु यातील तब्बल १२८ शाळांमधील किचन शेड नादुरुस्त झाले आहे.  त्यामुळे या शाळांत पोषण आहार उघड्यावर शिजवावा लागत आहे. 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासकीय माध्यमांसोबतच खासगी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरेशा व मूलभुत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. द्सरीकडे जिल्ह्यातील जि.प.च्या  १२८ वर शाळांमध्ये मध्यान्य भोजन (शालेय पोषण आहार) शिजविण्यासाठी किचन शेडच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  विशेष म्हणजे, मागील काही महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी खिचडी शिजवताना दुर्घटना घडल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. अशा घटना टाळण्यासाठी शासकीय शाळांमध्ये पोषण आहार शिजवण्यासाठी स्वतंत्र किचन शेड तयार करण्यात आले होते. शाळेत खिचडी शिजवताना कोणताही अनुचित प्रकार घडायला नको म्हणूनच सुसज्ज असे किचन शेड देण्यात आले होते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार किचन शेडचे कच्चे बांधकाम करून आणि प्रि फेब्रिकेटेड असे दोन प्रकार करण्यात आले होते. जिल्हा नियोजनकडे प्रस्तावजिल्ह्यातील ज्या १२८ शाळांमधील प्रि फेब्रिकेटेड किचन शेड नादुरुस्त आहेत. त्यामुळे उपलब्ध वर्गखोलीत पोषण आहार शिजविला जातो. परंतु त्या रुममध्ये स्वच्छता किती आहे, हे सांगणे कठिण आहे. या नव्याने किचन उभारण्यासाठी जि.प.शिक्षण विभागाकडून जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) कडे प्रस्ताव सादर करुन निधीची मागणी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :foodअन्नSchoolशाळा