शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नागपूर विद्यापीठातील पदवीधरांच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 9:49 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०५ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन शनिवार २४ मार्च रोजी करण्यात आले आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदवीधरांची एकूण संख्या घटल्याचे दिसून येत आहे. पुढील सत्रापासून दरवर्षी सप्टेंबर महिन्यातच दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

ठळक मुद्देशनिवारी १०५ वा दीक्षांत समारंभ राहुल बजाज, सौरभ त्रिवेदी, रचना कनोजिया, सायली पेशवे पहिल्या चार विद्यार्थ्यांत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०५ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन शनिवार २४ मार्च रोजी करण्यात आले आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदवीधरांची एकूण संख्या घटल्याचे दिसून येत आहे. पुढील सत्रापासून दरवर्षी सप्टेंबर महिन्यातच दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.२४ मार्च रोजी सकाळी १० वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित दीक्षांत समारंभाला तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील. दीक्षांत समारंभात २०१७ च्या हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४८३९१ विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. तसेच विविध परीक्षांमधील १७२ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना ३१२ सुवर्ण पदके, ४३ रौप्य पदके, १०२ पारितोषिके अशी एकूण ४५७ पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.मागील पाच दीक्षांत समारंभांच्या तुलनेत यंदा पदवीधरांचे प्रमाण घटले आहे. १०४ व्या दीक्षांत समारंभात पदवीधरांची संख्या ५७२५९ इतकी होती. यंदा हीच संख्या ४८३९१ वर आली आहे. ‘पीएचडी’ प्राप्त करणाऱ्यांचा आकडा १५२ वर आला आहे. पदवीधरांची संख्या कमी होण्यासाठी विविध मुद्दे कारणीभूत आहे. मात्र विद्यार्थ्यांचे स्थलांतर होत असल्याचा हा परिणाम नसल्याचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.वर्षनिहाय पदवीधरदीक्षांत समारंभ                                  पदवीधर१००                                                   ६९,९४११०१                                                    ६८,७७८१०२                                                 ७३,८७२१०३                                                 ६४,४५९१०४                                                 ५७,२५९१०५                                                ४८,३९१राहुल बजाजला २० पदके१०५ व्या दीक्षांत समारंभातील पदक विजेत्यांमध्ये विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. परंतु सर्वात जास्त पदक प्राप्त करणाºयांमध्ये मुलांनी बाजी मारली आहे. दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल सुनील बजाज (एलएलबी ५ वर्ष अभ्यासक्रम) याला सर्वाधिक २० पदके-पारितोषिके प्रदान करण्यात येतील. तर ‘सेंट्रल इंडिया कॉलेज आॅफ लॉ’चा विद्यार्थी सौरभ शरद त्रिवेदी (एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रम) याला १३ पदके-पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येईल. शासकीय विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी रचना प्रकाश कनोजिया (बीएसस्सी) व श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सायली सुरेंद्र पेशवे (बीए) या दोघींचा प्रत्येकी १२ पदके-पारितोषिकांनी सन्मान होईल.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर