शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

विदर्भातील कोरोना रुग्णसंख्या १० हजाराजवळ, मृतांची संख्या २६९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 11:33 IST

नागपूर, अमरावती व बुलडाण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात तर रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे.

ठळक मुद्दे२६६ रुग्णांची भर, चौघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावातील या चार महिन्यात रुग्णसंख्या १० हजाराजवळ पोहचली आहे. मंगळवारी यात २६६ रुग्णांची तर चार मृत्यूची भर पडली. रुग्णसंख्या ९७४३ झाली असून, मृतांची संख्या २६९ वर पोहचली आहे. नागपूर, अमरावती व बुलडाण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात तर रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे.  मंगळवारी पुन्हा शंभरावर रुग्णसंख्या गेली. १४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, तीन मृत्यूची नोंदही झाली आहे. एकूण बाधितांची संख्या ३१७१ तर मृतांची संख्या ५८ झाली आहे. १९८१ रुग्ण बरे झाले असून, ११३२ रुग्ण उपचार घेत आहेत. अमरावती जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात झपाट्याने रुग्ण वाढले.  ५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या १४०२ झाली आहे. ८६४ रुग्ण बरे झाले असून, ४९७ रुग्ण उपचार घेत आहेत.

बुलडाण्यातही रुग्ण वाढताना दिसून येत आहे. ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, बाधितांची संख्या ७८६ झाली आहे. ४३० रुग्ण बरे झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची संख्या ५९४ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ११ रुग्ण व एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ३५४ तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १७३ झाली आहे. अकोल्यात रुग्णसंख्या मंदावली आहे. १२ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची २१८४ वर पोहचली आहे. विदर्भाच्या इतर पाच जिल्ह्यात पाचच्या आत रुग्णांची नोंद झाली. यात गोंदिया जिल्ह्यात दोन, भंडारा जिल्ह्यात तीन, वर्धा जिल्ह्यात चार, वाशीम जिल्ह्यात एक तर चंद्रपूर जिल्ह्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.नागपुरात सायबर गुन्हेगारीत झपाट्याने वाढसाडेसहा महिन्यात २,२७५ तक्रारी : आॅनलाईन फसवणुकीचे सर्वाधिक प्रकारनरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपुरात सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. अवघ्या सहा महिन्यांमध्ये नागपुरात सायबर शाखेत २,२७५ तक्रारी आल्या आहेत. त्यावरून याचा प्रत्यय यावा.लॉकडाऊनमुळे आॅनलाईन व्यवहाराला प्रत्येक जण प्राधान्य देत आहे. बहुतांश व्यक्ती आर्थिक व्यवहारही आॅनलाईनच उरकत आहेत. कामधंदे बंद झाल्यामुळे अनेक जण दिवसभर मोबाईलमध्ये गुंतून असतात. त्यातून आॅनलाईन सर्चिंग वाढली आहे. नेमका याचाच गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या पद्धतींनी गंडवण्याचा सपाटा लावला आहे. नागपुरात दर दिवशी सायबर शाखेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. १ जानेवारी ते १५ जुलै २०२० पर्यंत सायबर शाखेकडे २,२७५ तक्रारी आल्या असून त्यातील सर्वाधिक तक्रारी फसवणुकीच्या आहेत. केवायसी अपडेट, आॅनलाईन शॉपिंग, एटीएम क्रेडिट कार्ड ब्लॉक करणे, कार्ड क्लोनिंग, ओटीपी शेअरिंग, आॅनलाईन फंड ट्रान्सफर असे हे फसवणुकीचे नवनवे प्रकार आहेत; त्यानंतर सोशल मीडियाचा गैरवापर करणे, त्रास देणे, धमक्या देणे, अश्लील शिवीगाळ करणे, विनयभंग करणे, अश्लील फोटो पाठविणे, असेही गुन्हे घडत आहेत. सायबर शाखेत दाखल झालेल्या तक्रारींपैकी ११२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून २९ गुन्हे दाखल झाले आहेत. २७ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.----गुन्हे आणि तक्रारीची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे.फसवणूक : १,९१६फेसबुक फोटो, न्यूड फोटो, अश्लील चित्रफीत, प्रोफाईलचा गैरवापर, विनयभंग : २९७हॅकिंग : ४७फोन, सोशल मीडियावरूनधमकी देणे : १५-------नागपुरातील डॉक्टरची अमेरिकेत फेक ई-मेल आयडीनागपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि ‘कोम्हाड’ या आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेचे पदाधिकारी असलेले डॉ. उदय बोधनकर यांच्या नावे गेल्या आठवड्यात सायबर गुन्हेगारांनी अमेरिकेत बनावट ई-मेल आयडी तयार केली. त्यावरून चुकीचे मेल पाठवून अमेरिका, फिलिपिन्स, आॅस्ट्रेलियासह विविध देशांतील डॉक्टरांना आर्थिक गंडा घातला. हे हाय प्रोफाईल प्रकरण सध्या वैद्यकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.----

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस