शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

फेरमूल्यांकनावरून ‘एनएसयूआय’, ‘अभाविप’ एकत्र : विद्यापीठ परिसरात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:40 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात फेरमूल्यांकनावरून होणारे आंदोलन संपल्यातच जमा होते. मात्र फेरमूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुदत संपल्याचे कारण समोर करून प्रशासनाने प्रवेश नाकारला अन् फेरमूल्यांकनावरून बऱ्याच कालावधीने विद्यापीठात आंदोलन झाले. विशेष म्हणजे विरुद्ध विचारधारा असलेल्या ‘एनएसयूआय’ व ‘अभाविप’ या संघटना या मुद्यावरून एकत्र आल्या व प्रशासनाविरोधात सायंकाळी उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देमुदत संपल्यानंतर प्रवेशास विद्यापीठाचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात फेरमूल्यांकनावरून होणारे आंदोलन संपल्यातच जमा होते. मात्र फेरमूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुदत संपल्याचे कारण समोर करून प्रशासनाने प्रवेश नाकारला अन् फेरमूल्यांकनावरून बऱ्याच कालावधीने विद्यापीठात आंदोलन झाले. विशेष म्हणजे विरुद्ध विचारधारा असलेल्या ‘एनएसयूआय’ व ‘अभाविप’ या संघटना या मुद्यावरून एकत्र आल्या व प्रशासनाविरोधात सायंकाळी उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले.नागपूर विद्यापीठात प्रवेशाची अंतिम तारीख ६ आॅगस्ट होती. त्यानंतर विद्यापीठाने त्याला एक महिना मुदतवाढ दिली. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीच ही प्रवेशाची मुदत असेल. फेरमूल्यांकनात उत्तीर्ण होणाºयांना अटींसह प्रवेश घेता येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. अभियांत्रिकीच्या फेरमूल्यांकनाचा निकाल १२ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. विद्यार्थी पुढील वर्षासाठी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी गेले असता, त्यांना नकार देण्यात आला. प्रवेशाची मुदत उलटून गेली असल्याचे कारण त्यांना सांगण्यात आले.यानंतर ‘अभाविप’ व ‘एनएसयूआय’चे कार्यकर्ते विद्यार्थ्यांसमवेत शनिवारी सायंकाळी विद्यापीठात धडकले. फेरमूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली. सुरक्षारक्षकांनी तातडीने पावले उचलत विद्यापीठाचे सर्व दरवाजे बंद केले. सायंकाळी ६ नंतर शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली. मात्र कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनीदेखील नियमांचा हवाला देत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला.विद्यापीठात नियमांचेच पालन : कुलगुरूविद्यार्थी संघटनांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर कुलगुरुंनी त्यांना दिलासा देण्यास नाकारले. प्रवेशाची अंतिम तिथी निघून गेली आहे. त्यामुळे आता प्रवेश देता येणार नाही. जर या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला तर पुढे लागणाºया फेरमूल्यांकन निकालानंतरदेखील प्रवेश द्यावा लागेल. असे झाले तर नियमानुसार ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे परीक्षेचे आयोजन करताना अडचणी येतील. विद्यापीठात नियमांचेच पालन करण्यात येईल, असे डॉ. काणे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन