शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरएचएम’चा ‘तो’ निधी मेळाव्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 20:29 IST

गडचिरोली जिल्ह्यात एनआरएचएमच्या कर्मचाऱ्याकडे पोलिसांना सापडलेला निधी हा गडचिरोलीत मेळाव्याच्या आयोजनासाठीचा होता. परंतु त्याचा विपर्यास करून संघटनांना बदनाम करण्याचे षड्यंत्र एनआरएचएमच्याच काही कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.

ठळक मुद्देलुटीचा प्रकार होऊ देणार नाही : ‘एनआरएचएम’ कर्मचारी संघटनेचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गडचिरोली जिल्ह्यात एनआरएचएमच्या कर्मचाऱ्याकडे पोलिसांना सापडलेला निधी हा गडचिरोलीत मेळाव्याच्या आयोजनासाठीचा होता. परंतु त्याचा विपर्यास करून संघटनांना बदनाम करण्याचे षड्यंत्र एनआरएचएमच्याच काही कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. जिल्ह्यात कुठल्याच एनआरएचएमने शासकीय सेवेत कायम करून देण्याच्या आमिषापोटी १ लाख रुपये दिलेले नाहीत. आरोग्य सेविकांची लूट आम्ही होऊ देणार नाही, असा दावा राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या मुख्य संयोजक कुंदा सहारे यांनी केला.‘संघटनांकडूनच सुरू आहे कर्मचाऱ्यांची लूट’ या आशयाचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी कर्मचारी संघटनांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्य संयोजक कुंदा सहारे, पौर्णिमा लांजेवार, माया रंगारी, मनिषा मेंढे, छाया चौधरी, नितू इंगळे, भारती बागडे आदी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी म्हणाल्या, राष्ट्रीय आरोग्य अभियानात तुटपुंज्या मानधनावर आरोग्य सेविका कार्यरत आहेत. संघटनेतर्फे न्यायासाठी विविध आंदोलन केले, पण शासन स्तरावर कोणत्याही मागणीला यश प्राप्त झाले नाही. या लढ्याला बळ देण्यासाठी गडचिरोली येथे राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येणार आहे. त्या मेळाव्यासाठी आरोग्य सेविकांकडून निधी गोळा करण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हाच निधी मिळाला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, न्यायासाठी आमचा लढा सुरू आहे. या लढ्यासाठी बैठका, मेळावे, प्रवास खर्च, न्यायालयात याचिका दाखल करणे, कर्मचारी गंभीर आजारी असल्यास मदत निधी, कोरोनात मृत्युमुखी पडलेल्या अभियानातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह निधी आदीसाठी संघटनांकडून लढा निधी उभारण्यात येत आहे. जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर समितीचे बँक खाते नसल्याने तालुका स्तरावरून निधी जमा करणे सुरू आहे.

टॅग्स :MONEYपैसाGadchiroliगडचिरोली