शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

एनपीआर हा एनआरसी लागू करण्याचा छुपा अजेंडा  : जावेद पाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 20:38 IST

संविधानाच्या मूल्यातून आलेल्या लोकशाहीत विषमतेचे मूळ असलेली मनुवादी व्यवस्था आणता येत नाही हे लक्षात आल्याने मनुवादी विचारधारेचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देएनआरसी म्हणजे मनुवादी व्यवस्था आणणारी प्रतिक्रांतीच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संविधानाच्या मूल्यातून आलेल्या लोकशाहीत विषमतेचे मूळ असलेली मनुवादी व्यवस्था आणता येत नाही हे लक्षात आल्याने मनुवादी विचारधारेचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. नॅशनल रजिस्टर  ऑफ  सिटिझन  (एनआरसी) हा त्याचाच भाग आहे. मात्र संविधानामुळे एनआरसी लागू करण्यास अडचण येत असल्याने नॅशनल पापुलेशन रजिस्टर (एनपीआर) च्या माध्यमातून ती लागू करण्यात येत आहे. एनपीआर हा एनआरसी आणण्याचा छुपा अजेंडाच आहे, अशी परखड टीका ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. जावेद पाशा यांनी केली.विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावित्री-फातिमा संस्कृती संगीतीमध्ये ते बोलत होते. कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे आयोजित कार्यक्रमात विद्रोही चळवळीचे धनाजी गुरव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जगजित सिंह, प्रसेनजित गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन सत्रात बोलतांना प्रा. पाशा म्हणाले, विषमतेने बरबटलेल्या समाज व्यवस्थेला समतेच्या मार्गावर आणण्यासाठी तथागत बुद्ध, महावीर, चक्रधर, बसव अण्णा, गुरुनानक, येशू, पैगंबर, कबीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळ्या काळात क्रांती केली आहे. मात्र या क्रांतीला मोडून सत्ता वर्चस्वासाठी मनुवाद्यांची प्रतिक्रांती सातत्याने सुरू आहे. एनआरसी आणि सीएए हा सुद्धा प्रतिक्रांतीचाच भाग होय, जो संविधान मानण्यास इन्कार करणाऱ्या संघाच्या थिंक टॅँकने आधीच ठरवून दिला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत बहुजनांचा सहभाग वाढविल्याने द्वेषाने महात्मा गांधी यांची हत्या करणारी हीच विचारधारा होय. मुस्लिमांना लक्ष्य करून आसाममध्ये एनआरसी लागू केल्यानंतर १४ लाखाहून अधिक बहुजन, आदिवासी व हिंदूनाच त्याचा फटका बसल्याने यांचे षड्यंत्र उघडे पडले. त्यामुळे देशात लागू करण्यात अडचणी लक्षात घेता वेगळा मार्ग निवडण्यात आला. धनाजी गुरव म्हणाले, विषमतापूर्ण व्यवस्थेसाठी प्रतिक्रांती करणे हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे. मात्र फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे अनुयायी, गांधींचे अनुयायी आणि पुरोगामी चळवळी चालविणाºयांनी काय केले, याचा विचार करावा. मनुवाद्यांनी वेगवेगळ्या समाजाच्या दैवतांना हिंदुत्वाच्या बुरख्याखाली एकत्रित करून सत्ता वर्चस्व कायम करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. आम्ही मात्र बुद्ध, महावीर, लिंगायत आणि गुरुनानकांच्या समतावादी विचारधारांना एका सूत्रात बांधू शकलो नाही. भारतीय संविधानात या सर्व विचारवंतांचे सार आहे, तरीही या समाजातील लोक संविधान मोडणाºयांच्या दावणीला बांधले जात असल्याचे परखड मत त्यांनी मांडले.प्रास्ताविक प्रसेनजित गायकवाड यांनी केले. संचालन माधुरी सेलोकर यांनी केले.

 मोदी, शहांचे आभार समता आणि सर्वांना समान अधिकारासाठी महान कार्य करणाºया महात्मा गांधी व डॉ. आंबेडकरांना समजून घेण्याचा प्रयत्न बहुजन समाज व मुस्लिमांनी कधी केला नाही. मात्र सीएए, एनआरसी आणण्याच्या घोषणेनंतर या महान नेत्यांशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी मोदी आणि शहा यांचे आभार मानावेच लागतील, अशी उपरोधिक टीका प्रा. पाशा यांनी केली.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसीnagpurनागपूर