शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अबकी बार...

By admin | Updated: June 12, 2014 01:05 IST

आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला उत्तर नागपूर. उत्तर नागपुरात विधानसभेत उत्तरायण कोण करणार ? अबकी बार कोण ? बसपाच्या हत्तीवर कोण ? भाजपमध्ये बंडखोरी होईल का ? अशा महाचर्चांनी या

उत्तरेत उत्तरायण कोणाचे ? : भाजपची हेवीवेट टीमजितेंद्र ढवळे - नागपूर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला उत्तर नागपूर. उत्तर नागपुरात विधानसभेत उत्तरायण कोण करणार ? अबकी बार कोण ? बसपाच्या हत्तीवर कोण ? भाजपमध्ये बंडखोरी होईल का ? अशा महाचर्चांनी या मतदारसंघातील वातावरण तापले आहे. उत्तर नागपुरात कॉँग्रेसचे कार्यकर्ते अबकी बार...? एवढेच बोलतात नंतर गप्प राहतात. काय आहे त्यांच्या मनात !रिपब्लिकन पक्ष जिथे घडला. रुजला. चळवळींना रूप मिळाले. खोब्रागडे गटाचा गड उत्तर नागपूर. गडकरींच्या हेवीवेट टीमने येथे लोकसभेत उत्तरायण केले. १८,५४० मतांची आघाडी घेत गडकरींनी एका गाडीवर बसून प्रचार करणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार आणि रोहयो मंत्री नितीन राऊत यांची हवा गुल केली. गडकरींच्या भाषेत ‘पंक्चर’ केले !रिपब्लिकन पक्षाला गटबाजीने घेरल्यानंतर मतदारांनी काँग्रेसला या मतदार संघात डोक्यावर घेतले. मंत्री नितीन राऊत दीड दशकापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यावेळीही राऊत यांचाच दावा आहे. मात्र त्यांच्या दावेदारीला आवाहन आहे, राजा द्रोणकर या काँग्रेस कार्यकर्त्याचे. इंदोऱ्यातील बुद्धविहाराच्या पायऱ्यांवरील महाचर्चांत याचे उत्तर मिळेल ! १९९० मध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया खोब्रागडे गटाचे उपेंद्र शेंडे यांचा भाजपचे भोला बढेल यांनी १२ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. १९९० आणि २०१४ ची भाजप यात फरक आहे. ताकद वाढली आहे. तगडी टीम आहे.१९७८ च्या निवडणुकीत सूर्यकांत डोंगरे या अपक्ष उमेदवाराने काँग्रेस (आय) चे बाळकृष्ण वासनिक यांचा पराभव केला होता. १९७८ आणि १९९० च्या निवडणुकांतील राजकीय समीकरणांना आज उत्तर नागपुरात महत्त्व आले आहे. लोक तसे बोलतातही. परवा राणी कोठी येथे झालेल्या समीक्षा बैठकीत काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या याच भावना होत्या.इकडे भोला बढेल होण्यासाठी भाजपजवळ हेवीवेट टीम आहे. मात्र ती बाहेरची आहे. गेल्यावेळी भाजपने राजेश तांबे यांना मैदानात उतरविले होते. ते ४०, ०६७ मतांवर थांबले. तांबे २००४ मध्ये बसपाच्या हत्तीवर स्वार होते. ते लढले पण हरले. यावेळी तांबे यांच्या तोडीची सोनेरी टीम भाजपजवळ आहे. यात पहिले नाव आहे डॉ.मिलिंद माने यांचे. प्रत्येक गल्लीत माने याचे नेटवर्क आहे. गेल्यावेळी २३ हजार ६६२ मते मिळवीत माने यांनी राऊत यांना घाम फोडला होता. माने बाजी मारतील असा पोल पंडितांचा अंदाज होता. गणित चुकले. मानेंजवळ टीम होती, पण पक्ष नव्हता. यावेळी ते गडकरींच्या जवळ आहे, पण भाजपमध्ये नाही ! गेल्यावेळी बसपाच्या हत्तीवर स्वार झालेले धरमकुमार पाटील कोणत्या पक्षातून लढतील ? बसपाचा हत्ती त्यांना तितकाच जवळचा आहे. कारण उत्तर नागपूर आहे. येथील जातीय समीकरण वेगळे आहे. रिस्क कोण घेणार ?राऊत यांच्या मंत्रिपदाच्या राजीनामा पत्रानुसार सांगायचे झाल्यास ‘सेक्युलर’ नागपुरातील दलितांची मते गडकरींना मिळाली. गडकरीसारखी रिस्क पाटील घेतील ? माजी आमदार भोला बढेल, संघाचे संघपाल उपरे यांचेही येथे नटवर्क आहे. त्यांचाही दावा आहे. माजी उपमहापौर संदीप जाधव आणि अनिल सोले यांच्या प्रचारात आघाडी घेणारे संदीप गवई ही जनरेशन नेक्स्ट भाजपजवळ आहे. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष धरमपाल मेश्राम यांचा दावा अधिक आहे. उत्तरचे तिकीट वाटप करताना प्रदेश भाजपाला १०० गुणांची प्रश्नपत्रिकाच यावेळी तयार करावी लागणार आहे. जो अधिक प्रश्नांची उत्तर सोडवेल. त्यांनाच ‘उत्तर’चे तिकीट. येथे बसपाच्या हत्तीवर भाजपचे बंडखोर स्वार असेल. यात शंका नाही. विदेशातून उत्तर नागपुरात दाखल झालेले मधुसूदन गवई यांनाही बसपाचे तिकीट येथे मिळू शकते. बसपाचे तिकीट मिळविण्यासाठी ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गवई यांच्याजवळ आहेत!