शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘योग व निसर्गाेपचार पदवी’ अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 12:04 IST

‘योग व निसर्गोपचार पदवी’ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अ‍ॅन्ड योगा सायन्सेस) या नवीन अभ्यासक्रमासह चार अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकमार्फत हे अभ्यासक्रम सुरू होत असून, राज्य शासनाने नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय ३१ जानेवारी २०१९ रोजी घेतला आहे.

ठळक मुद्देआरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पुढाकारचार नवे अभ्यासक्रम सुरू करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘योग व निसर्गोपचार पदवी’ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अ‍ॅन्ड योगा सायन्सेस) या नवीन अभ्यासक्रमासह चार अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकमार्फत हे अभ्यासक्रम सुरू होत असून, राज्य शासनाने नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय ३१ जानेवारी २०१९ रोजी घेतला आहे.आरोग्य विज्ञान विद्यापीठाने योग व निसर्गोपचार प्रमाणपत्र, योग व निसर्गोपचार पदविका, योग व निसर्गोपचार पदवी आणि योग व निसर्गोपचार पदव्युत्तर पदविका हे चार अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. वरील अभ्यासक्रमांपैकी योग व निसर्गोपचार पदवी (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अ‍ॅन्ड योगा सायन्सेस) या अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षाचा पाठ्यक्रम तसेच शैक्षणिक सोईसुविधा, अध्यापक वर्ग आदी किमान मानके विद्यापीठामार्फत तयार करण्यात आलेली आहेत. वरील अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने एका पत्राद्वारे शासनाकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने योग व निसर्गोपचार पदवी (बीएनवायएस) या अभ्यासक्रमास राज्य शासनाने ३१ जानेवारी २०१९ रोजी निर्णय घेऊन मान्यता दिली. सोबतच योग व निसर्गोपचार पदवी अभ्यासक्रमाचे पाठ्यक्रम व निकष महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत निश्चित करण्यात यावेत, वरील अभ्यासक्रमाचे पाठ्यक्रम व निकष निश्चिती झाल्यानंतर विद्यापीठामार्फत ते शासनाच्या मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचनाही शासनाने विद्यापीठाला केल्या आहेत. यामुळे लवकरच मेडिकल महाविद्यालयातून हे अभ्यासक्रम चालविले जाण्याची शक्यता आहे.

‘डॉक्टर’ पदवी लावता येणार नाही‘योग व निसर्गोपचार व्यावसायिक’ अधिकृतपणे ‘नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून व्यवसाय करण्यास वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ नुसार पात्र ठरणार नाहीत. योग व निसर्गोपचार व्यावसायिक हे वैद्यक व्यवसायी म्हणून मानण्यात येणार नाहीत किंवा त्यांना वैद्यकीय व्यवसायी असल्याचा दावा करता येणार नसल्याचे निर्णयात म्हटले आहे. शिवाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना आपल्या नावापुढे वा नंतर डॉक्टर किंवा तत्सम पदवी लावता येणार नाही, असेही स्पष्टपणे नमूद केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य