शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

आता राळेगण सिद्धीच्या धर्तीवर नागपुरातील बंधारयांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:02 PM

नागपूर जिल्ह्यातील बंधारयाची कामेसुद्धा आता राळेगण सिद्धीच्या धर्तीवर करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सूचनाजलयुक्त शिवार अभियान कामांचा घेतला आढावा

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर जिल्ह्यातील बंधारयाची कामेसुद्धा आता राळेगण सिद्धीच्या धर्तीवर करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या.बचत भवन येथे नागपूर जिल्ह्यातील जलसंधारण व जलयुक्त शिवार कामासंदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते. यावेळी आमदार समीर मेघे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, रोहयो उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाये उपस्थित होते.नदी, नाल्याचे पाणी अडवून बंधारा बांधण्यात येतो. या बंधाºयात अधिक जलसाठा शिल्लक राहावा, याकरिता बंधाºयाची कामे राळेगणसिद्धी येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्या प्रमाणे करण्यात यावी. याकरिता प्रत्यक्ष राळेगणसिद्धी येथील बंधाऱ्या ची पाहणी करून अहवाल तयार करण्याच्या सूचना सुद्धा पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्याना केल्या.पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी यावेळी दिली. तसेच शासकीय विभाग आणि लोकसहभागातून पहिल्याच वर्षी ३१३ गावांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार मृदा व जलसंधारणाची ५ हजार ५१ कामे पूर्ण करण्यात आली. ६१.८८ लाख घनमीटर नाल्यातील व तलावातील गाळ काढण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.जलयुक्त शिवार अभियानात २०१६-१७ या वर्षात ११९ गावे जलपरिपूर्ण झाली आहे. या अभियानातंर्गत २०१७-१८ या वर्षात नागपूर जिल्ह्यातील २२० गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. माथा ते पायथा तत्त्वावर निवडण्यात आलेल्या गावांमध्ये ३ हजार ४१९ कामे प्रस्तावित करण्यात आली असून, या कामांवर १५० कोटी ८४ लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली.

तीन वर्षात ४३२ गावे जलयुक्तजलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात तीन वर्षात ४९८ गावांपैकी ४३२ गावे जलयुक्त झाली आहेत. विविध उपाययोजनांमुळे शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या पाणी टंचाईवर मात करतानाच भूगर्भातील जलाशयात लक्षणीय वाढ झाली आहे.रस्तेही होणार खड्डेमुक्तनागपूर शहरातील विविध रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येक रस्त्यांची पाहणी करुन येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम तयार करा तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डेही १५ डिसेंबरपर्यंत पूर्णपणे बुजवा असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात खड्डेमुक्त रस्ते या विषयावर विविध विभागांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार समीर मेघे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, आमदार सुधाकर देशमुख, जिल्हा परिषद सभापती निशा सावरकर, नागपूर महानगरपालिका आयुक्त अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे सह संबंधित विभागाचे अभियंता, उपअभियंता उपस्थित होते.शहरातील रस्त्यांवर ८ ते १० हजार खड्डे असून यासाठी कालबद्ध कार्यक्रमानुसार अंमलबजावणी करावी, यासाठी कार्यकारी अभियंता व संबंधित उप अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.ग्रामीण भागातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे. विशेषत: तारसा- निमखेडा, कन्हान- तारसा, कान्हान- निमखेडा मार्गावर सतत वर्दळ सुरू त्वरित दखल घेऊन खड्डे बुजविण्यात यावे. तसेच नॅशनल हायवेवरील १६७ किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करा. या व्यतिरिक्त काटोल, रामटेक, नरखेड, उमरेड- कुही , कामठी या विधानसभा मतदारसंघनिहाय खड्डे असलेल्या रस्त्यांचा अहवाल तयार करुन रस्ते दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील विविध ५० रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे असून अपघाताला आव्हान दिल्या जात असल्याने या मार्गावरील खड्डे बुजविण्याकरिता नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अभियंतांना या बैठकीत देण्यात आल्या.

टॅग्स :Damधरण