शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आता सायकलसोबत करा मेट्रोने प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 23:48 IST

Now travel by metro with the bicycle , nagpur newsनागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू आहे. नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत. यात प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रोने सायकल सोबत नेण्याची मुभा देण्यात आली असून प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत.

ठळक मुद्देमेट्रोमध्ये सायकल नेणे शक्य : पर्यावरणपूरक प्रवासाला नागरिकांची पसंती

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू आहे. नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत. यात प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रोने सायकल सोबत नेण्याची मुभा देण्यात आली असून प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत.

महामेट्रोने प्रवाशांच्या सुविधेसाठी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. गुरुवारी सुभाषनगर मेट्रो स्टेशन येथून लोकमान्यनगर स्टेशन दरम्यान काही नागरिकांनी सायकल सोबत मेट्रोने प्रवास केला. प्रवास करताना मेट्रोच्या प्रवाशांनी सुभाषनगर मेट्रो स्टेशन येथून लिफ्टच्या साहाय्याने कॉनकोर्स येथे प्रवेश केला. तिकीट काऊंटर येथून तिकीट घेऊन एएफसी गेटमधून परिसरात प्रवेश केला. त्यानंतर लिफ्टच्या साहाय्याने प्लॅटफॉर्मवर पोहोचून मेट्रो रेल्वेत प्रवेश केला. आपल्या सायकलसोबत हे प्रवासी आपल्या स्थानकापर्यंत पोहोचले. मेट्रोची ही सेवा आमच्यासारख्या सायकल चालविणाऱ्या व्यक्तींसाठी सोयीस्कर असून आता मेट्रोने सायकल नेणे सोयीस्कर झाल्याच्या प्रतिक्रिया या प्रवाशांनी व्यक्त केल्या. सायकलचा वापर करणारे नागरिक नक्कीच या सेवेचा लाभ घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सेवेमुळे आता मेट्रोचे प्रवासी आपल्या सोबत सायकल नेऊ शकणार असून मेट्रोची ही पर्यावरणपूरक सेवा नागरिकांच्या फायद्याची ठरणार असल्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Metroमेट्रोCyclingसायकलिंग