शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अब की बार विदर्भ की सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:02 IST

भाजपाने विदर्भाच्या माणसांना वचन दिले होते; पण त्यांनी वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला आहे. भाजपाला आता पळवून लावले पाहिजे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत भाजपाला विदर्भातून हद्दपार केले पाहिजे, यावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दुसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनतील विदर्भ संसद या विषयावर आयोजित परिसंवादात सर्वांचे एकमत झाले.

ठळक मुद्देविदर्भ संसद परिसंवादात सर्व संघटनांचे एकमत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाने विदर्भाच्या माणसांना वचन दिले होते; पण त्यांनी वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला आहे. भाजपाला आता पळवून लावले पाहिजे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत भाजपाला विदर्भातून हद्दपार केले पाहिजे, यावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दुसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनतील विदर्भ संसद या विषयावर आयोजित परिसंवादात सर्वांचे एकमत झाले.अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीचे सदस्य अ‍ॅड. गोविंद भेंडारकर होते. राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे अध्यक्ष राजेश काकडे, व्ही कनेक्टचे अ‍ॅड. मुकेश समर्थ, विदर्भ माझाचे राजकुमार तिरपुडे, चंद्र्रपूरच्या यल्गार संस्थेच्या पारोमिता गोस्वामी, अंजली कुळकर्णी, जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, विदर्भ जागरणचे नितीन रोंघे, चंद्र्रपूरचे अ‍ॅड. मिर्झा फरहत बेग, विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. नीरज खांदेवाले, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रबीर चक्रवर्ती, बीआरएसपीचे डॉ. रमेश जनबंधू, कोकणातून आलेले भाऊ पानसरे, दिल्लीहून आलेले राष्ट्रीय प्राऊटिस्ट ब्लॉकचे संतोषानंद महाराज यांनी परिसंवादात सहभाग नोंदवला.प्रास्ताविक राजकुमार नागुलवार यांनी केले.संचालन विजया धोटे यांनी केले.१ मे रोजी ग्रामसभांमध्ये ठरावविदर्भ राज्य दिले नाही तर सत्तेमधील १० खासदार आणि ६० आमदार भाजपाला गमवावे लागतील. लोकसभेत प्रतिनिधी बोलत नसतील तर आपल्याला आता विदर्भाच्या सर्व ग्रामसभांमध्ये वेगळ्या विदर्भाचा ठराव करावा लागणार आहे. हा ठराव १ मे रोजी केला जाणार आहे, असे अ‍ॅड. नीरज खांदेवाले म्हणाले.राष्ट्रवादीचे समर्थनआम्हालाही वेगळा विदर्भ पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनिल अहेरकर यांनी विदर्भाच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले. यावेळी पक्षाचे नेते राजू नागुलवार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठीशी असून आम्ही सर्व नेते भरघोसपणे सहाय्य करू, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भagitationआंदोलन