शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

आता मद्यतस्करीसाठी एस.टी. बसचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 10:42 PM

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मद्यतस्करी करण्याचा प्रयत्न बसवाहक, चालकाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला.

ठळक मुद्देनागपुरात बसवाहक, चालकाची सतर्कता५३२ बाटल्या दारू जप्त

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मद्यतस्करी करण्याचा प्रयत्न बसवाहक, चालकाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी दारूच्या ५३२ बाटल्या जप्त केल्या.चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित झाल्यानंतर तेथील मद्यविक्रेते वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून मद्यतस्करी करीत आहेत. प्रारंभी खासगी वाहनातून ते दारू तस्करी करायचे. आता दारूच्या तस्करीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसचाही वापर केला जातो. अशाच प्रकारे चंद्रपूरला जाणाऱ्या  एसटी बसच्या (एमएच ४०/ वाय ५५६३) छतावर मद्य तस्करांनी चार पोत्यात दारूच्या बाटल्या भरून ठेवल्या. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता ही बस मोरभवन स्थानकावर उभी होती. बस चंद्रपूरला निघण्याची वेळ झाली असताना बसचालक गणेशसिंग रघुवीरसिंग बैस (वय ५७, रा.दत्तानगर) आणि सतीश बाबुराव लुथळे (वय ४१, रा. तुकूम चंद्रपूर) यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बसच्या छतावर एक नजर टाकली असता चार पोती लगेज दिसले. हे लगेच कुणाचे अशी विचारणा बसवाहक लुथळे यांनी बसमधील प्रवाशांकडे केली. मात्र, कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संशय बळावल्याने बसचालक, वाहकांनी विभाग नियंत्रक सुशील केशवराव भुते यांच्या मार्फत सीताबर्डी पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पोती खाली उतरवून तपासली असता त्यात आॅफिसर चॉईसच्या एकूण ५३२ दारूच्या बाटल्या आढळल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. त्याची कंपनी किंमत १७ हजार रुपये असली तरी मद्यविक्रेत्यांनुसार ही दारू एक लाख रुपये किमतीची आहे.रोजचाच प्रकारदारूबंदी असलेल्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात नागपुरातून रोजच मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जाते. त्यासाठी मद्यतस्करांकडून एसटी बस, खासगी बस, ट्रकसह विविध वाहनांचा वापर केला जातो. काही मद्यसम्राट आपल्या आलिशान कारमधून दारूची वाहतूक करतात. नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरून चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात लाखोंची देण दिली जाते. दारूबंदी झाल्याने चंद्रपुरात ६० रुपये किमतीची दारूची बाटली १५० ते २०० रुपयाला विकली जाते. त्यामुळे मद्यतस्कर पोलिसांना महिन्याला लाखोंची देण देऊन कोट्यवधींची उलाढाल करतात.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी