शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आता बोधलकसा येथेही एमटीडीसीचे उपहारगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:40 IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) बोधलकसा (जि. गोंदिया) येथे निसर्गरम्य परिसरात सर्व सोयींनी युक्त असे पर्यटक निवास उभारले आहे. या पर्यटक निवासात आता महामंडळाद्वारे नव्याने उपहारगृह सुरू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) बोधलकसा (जि. गोंदिया) येथे निसर्गरम्य परिसरात सर्व सोयींनी युक्त असे पर्यटक निवास उभारले आहे. या पर्यटक निवासात आता महामंडळाद्वारे नव्याने उपहारगृह सुरू करण्यात आले आहे.पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीमार्फत राज्यातील विविध भागात पर्यटक निवास (रिसॉर्ट) चालवले जातात. विदर्भातही अशी अनेक पर्यटक निवासस्थळे असून बोधलकसा येथील पर्यटक निवास तेथील निसर्गसंपदेमुळे विशेष लोकप्रिय आहे. आता या भागात अधिक पर्यटकांना आकर्षित करून या भागातील पर्यटनाला तसेच रोजगार वाढीला एमटीडीसीमार्फत चालना देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बोधलकसा पर्यटक निवासाचे सक्षमीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी दिली.बोधलकसा पर्यटक निवासात आता सुरू करण्यात आलेल्या उपहारगृहात पर्यटकांसाठी स्थानिक खाद्यपदार्थांसोबत राज्यातील विविध प्रांतातील खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पर्यटकांनी या पर्यटक निवासास भेट देऊन येथील निसर्गरम्य परिसराचा त्याचप्रमाणे स्थानीय खाद्यपदार्थांसोबत महाराष्ट्रातील इतर खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी केले आहे. एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कांबळे यांच्या हस्ते नुकताच या उपहारगृहाचा शुभारंभ करण्यात आला.

टॅग्स :forestजंगलtourismपर्यटनhotelहॉटेल