शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

आता वाहन परवान्यातून शिक्षणाची अट होणार शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 20:43 IST

वाहन चालविण्याचा व्यावसायिक परवाना मिळविण्यासाठी किमान आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण असलेच पाहिजे, अशी अट होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ही अट शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे आता अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या कुशल चालकांना व्यावसायिक वाहन परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. नागपुरात याचा फायदा शेकडो चालकांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देअशिक्षित कुशल चालकांना रोजगाराची संधीउपराजधानीतील शेकडो चालकांना मिळणार व्यावसायिक परवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहन चालविण्याचा व्यावसायिक परवाना मिळविण्यासाठी किमान आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण असलेच पाहिजे, अशी अट होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ही अट शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे आता अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या कुशल चालकांना व्यावसायिक वाहन परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. नागपुरात याचा फायदा शेकडो चालकांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दररोज रस्त्यावर नव्या गाड्यांची भर पडत आहे. ‘ऑटोमोबाईल्स’ क्षेत्र कमालीचे वाढत आहे. देशात २२ लाखांहून अधिक वाहन चालकांची गरज आहे. मात्र सरकारच्या आधीच्या नियमानुसार अवजड वाहन परवाना मिळण्यासाठी किमान आठवा वर्ग पास असणे बंधनकारक होते. यामुळे अशिक्षित व्यक्ती व्यावसायिक वाहन परवानापासून वंचित होत्या. दूरदृष्टी आणि देशात उपलब्ध असलेले रोजगार याचा विचार करून, दळणवळण मंत्रालयाने यातील शिक्षणाची अटच शिथिल केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मोटार वाहन नियमावली १९८९ या कायद्यातील सुधारणेसाठी याबाबत थेट अध्यादेशाचा मार्ग निवडला. यामुळे चालक बनण्यासाठी आता पुस्तकी शिक्षणापेक्षा कौशल्याला महत्त्व येणार आहे. देशांतर्गत वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या संधी लक्षणीयरीत्या वाढण्याचीही शक्यता आहे.१७ लाखांवर पोहचली वाहनांची संख्याउपराजधानीत वाहनांची संख्याही १७ लाखांवर पोहचली आहे. साधारण दीड व्यक्तीमागे एक वाहन असे हे प्रमाण आहे. यात सर्वात जास्त दुचाकी, कार, ऑटोरिक्षा, कमी वजनांची मालवाहू वाहने, बस, ट्रक आदी वाहने आहेत. प्रवासी व मालवाहतुकीचे नवे पर्याय समोर येत आहे. यात व्यावसायिक परवानासाठी शिक्षणाची अट शिथिल करण्यात येणार असल्याने याचा फायदा उपराजधानीतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील कुशल चालकांना होणार आहे.

तरुणांना रोजगाराच्या संधी-भालेराव विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेराव म्हणाले, अनेक अशिक्षित तरुण रोजगार म्हणून ‘चालक’ या व्यवसायाकडे पाहतात. परंतु वाहन परवानासाठी आठवा वर्ग पास,  शिक्षणाची अट असल्याने ते रोजगारापासून मुकायचे. परंतु आता शिक्षणाची अट रद्द होणार असल्याने अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.अशिक्षित कुशल चालकांना संधी मिळणार-खान नागपूर ट्रेलर असोसिएशनचे प्यारे खान म्हणाले,  महामार्ग क्षेत्रात चालकांची फार कमतरता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यावसायिक वाहन परवान्यात शिक्षणाची अटच शिथिल केल्याने ही कमतरता दूर होईल. विशेषत: अशिक्षित कुशल चालकांना रोजगाराच्या संधी मिळतील. परिणामी, व्यवसायालाही मदत मिळेल. परवानासाठी लागणारी शिक्षणाची अट शिथिल करण्यासाठी असोसिएशनतर्फे आरटीओला निवेदनही देण्यात आले होते.  पुस्तकी शिक्षणापेक्षा वाहन कौशल्याचे प्रशिक्षण आवश्यक -कासखेडीकर जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर म्हणाले, व्यावसायिक परवान्यातून शिक्षणाची अट शिथिल करीत असताना, चालकाला वाहन कौशल्याचे प्रशिक्षण देणे, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणेही आवश्यक आहे. यामुळे अपघात कमी होतील. पूर्वीचे अनेक चालक शिक्षित नव्हते, परंतु ते कुशल चालक होते. लोक त्यांच्यावर विसंबून असायचे. नव्या कायद्यामुळे अशा अशिक्षित चालकांना संधी मिळणार आहे. कौशल्य असताना परवाना नाही-एजाज अहमद  एजाज अहमद मूर्तजा म्हणाला, मॅकेनिक म्हणूनच लहानाचा मोठा झालो. या व्यवसायात असल्याने कारपासून ते जड वाहने चालविण्याचे कौशल्य प्राप्त आहे. परंतु व्यावसायिक वाहन परवानासाठी आठवा वर्ग पास असल्याची अट असल्याने परवाना नाही. कौशल्य असूनही आवडत्या क्षेत्रात रोजगार करता येत नसल्याची खंत होती. परंतु आता शिक्षणाची अट शिथिल होणार असल्याने माझ्यासारख्या अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहे.अर्जच भरता येत नाही-आदे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, आठवी नापास असणाऱ्या उमेदवारांना व्यावसायिक वाहन परवान्याचा अर्जच भरता येत नाही. कारण, याचे प्रशिक्षण देणारे ड्रायव्हिंग स्कूल किंवा परवानासाठी ऑनलाईन अर्ज भरताना आठवा वर्ग पास असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. त्याशिवाय समोरील प्रक्रिया पूर्णच होत नाही. व्यावसायिक वाहन परवान्यातून शिक्षणाची अट शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर