शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये खासगी कंपन्यांना वीज पुरवठ्याचा परवाना मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:06 IST

२२ जुलै रोजी सुनावणी : टोरंट पॉवरचा नागपूर, पुणे तर अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात समांतर वीज वितरण व्यवस्थेच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. महावितरणे मुंबई शहरातील वीज वितरणासाठी परवान्याची मागणी केल्यानंतर आता नागपूर, पुणे, ठाणे आदी शहरांमध्येही खासगी कंपन्यांना परवाने देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश नियामक आयोगाने नोटीस जारी करीत खासगी कंपन्यांना परवान्यासाठी पात्र ठरवत २२ जुलै रोजी ऑनलाइन सुनावणी घेण्याची घोषणा केली आहे. या खासगी कंपन्यांना परवाना मिळाल्यास महावितरणचा एकाधिकार मोडीत निघणार आहे. ही कृती म्हणजे उर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाच्या दिशेने पाऊल असल्याची टीका होऊ लागली आहे.

टोरंट पॉवरने नागपूरसह परिसरातील तसेच पुणे येथील वीज वितरणासाठी परवान्याची मागणी केली आहे. यासाठी नोव्हेंबर २०२२मध्ये आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. ८ जानेवारी २०२३ रोजी आयोगाने नोटीस प्रकाशित करीत नागरिकांकडून सूचना व आक्षेप मागविले. याच प्रकारचा एक अर्ज अदानी इलेक्ट्रिसिटीने ठाणे, नवी मुंबई आदी भागांसाठी केला होता. दरम्यान, मुंबईवगळता राज्यभरात वीज वितरण करणारी सरकारी कंपनी महावितरणने याच महिन्यात मुंबई शहरातील कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरातील बांद्रा ते दहीसर, पूर्व उपनगरात विक्रोळी ते चुनाभट्टी व मानखुर्दसोबतच चेना व काजुपाडा, मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात वीज वितरणाची परवानगी मागितली आहे.

कोणत्या कंपनीने मागितले ?

  • महावितरण : मुंबई शहर व मीरा भाईंदर मनपा क्षेत्र
  • टोरंट पॉवर : नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, रांजणगाव, चाकण, कुरकुंभ, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे मनपा क्षेत्र.
  • अदानी: मुलंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, खारघर, तळोजा व उरण.

अर्जाना हिरवी झेंडीआयोगाने नोटीसमध्ये म्हटले आहे की, टोरंट पॉवर व अदानी इलेक्ट्रिसिटी वीज वितरणासाठी पात्र ठरले आहेत. त्यांना परवाना देण्यासाठी प्रस्तावित केले आहे. आयोगाने या निर्णयावर १६ जुलैपर्यंत आक्षेप व सूचना मागविल्या आहेत. कंपन्यांना यावर तीन दिवसात उत्तर द्यायचे आहे. २२ जुलै रोजी यासंदर्भात ऑनलाइन सुनावणी होईल.

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीज