शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैदी होणार आता ‘एमबीए’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 20:47 IST

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदीदेखील ‘एमबीए’ होऊ शकणार आहे. ९ कैद्यांनी ‘ओपनमेट’ ही ‘एमबीए’ प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण केली असून लवकरच ते प्रत्यक्ष अभ्यासक्रमालादेखील प्रवेश घेणार आहेत.

ठळक मुद्दे‘इग्नू’चा पुढाकार९ कैदी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण तुरुंगातूनच केला अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकदा क्षणिक रागापोटी हातून गुन्हा घडतो व कारागृहात कैद्याचे आयुष्य जगावे लागते. कारागृहातून बाहेर आल्यानंतर कैद्यांना स्वत:ची उपजिविका भागविण्यासाठी काय करावे हा मोठा प्रश्न असतो. कैद्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी ‘इग्नू’च्या माध्यमातून थेट कारागृहातच ज्ञानगंगा पोहोचविण्यात आली. आता तर एक पाऊल पुढे टाकण्यात आले असून मध्यवर्ती कारागृहातील कैदीदेखील ‘एमबीए’ होऊ शकणार आहे. ९ कैद्यांनी ‘ओपनमेट’ ही ‘एमबीए’ प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण केली असून लवकरच ते प्रत्यक्ष अभ्यासक्रमालादेखील प्रवेश घेणार आहेत.‘इग्नू’तर्फे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी पूर्व तयारी अभ्यासक्रम, बीए, एमए यासारखे अभ्यासक्रम राबविण्यात येतात. या कैद्यांना तुरुंगातच अभ्यासाचे साहित्य पुरविण्यात येते. ‘इग्नू’ व ‘वायसीएमओयू’च्या माध्यमातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या काही कैद्यांनी ‘एमबीए’ शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली. नव्या नियमांनुसार ‘इग्नू’ची पदवी घेणारे कैदी ‘एमबीए’ प्रवेशासाठी पात्र आहेत. त्यानुसार कारागृहातील ११ कैद्यांनी ‘ओपनमेट’ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केले. ‘इग्नू’तर्फे कैद्यांना प्रवेश परीक्षेचे मोफत मार्गदर्शनदेखील उपलब्ध करुन देण्यात आले. प्रवेश परीक्षेत ‘अ‍ॅप्टिट्यूड’, इंग्रजी भाषा, ‘अ‍ॅनॅलिटिकल स्कील्स’ इत्यादींवर प्रश्न विचारण्यात आले होते. यातील ९ कैदी तुरुंगात घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाले. कारागृहात या कैद्यांचा सत्कार करण्यात आला.‘इग्नू’चे प्रादेशिक संचालक डॉ.पी.शिवस्वरुप, अध्ययन केंद्राचे समन्वयक डॉ.मुकुल बुरघाटे, डॉ.पद्माकर सहारे, डॉ.सुनिल इखरकर, डॉ.तुषार टाले व डॉ.श्यामल रुईकर यांनी कैद्यांना मोफत मार्गदर्शन केले. ‘इग्नू’च्या विशेष अध्ययन केंद्राचे समन्वयक योगेश पाटील यांनी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हतवडे गुरूजी तसेच राजेश वासनिक हेदेखील उपस्थित होते.शिक्षणातून येईल सकारात्मकतातुरुंगात शिक्षा भोगून झाल्यानंतर येथील शिक्षण आयुष्यात नेहमी कामाला येईल. या शिक्षणाच्या भरवशावर स्वत:ला सिद्ध करता येईल. शिक्षणामुळे आमच्यातील सकारात्मकता वाढली आहे, असे मत प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणाºया एका कैद्याने व्यक्त केले. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचे पुनर्वसन व्हावे, या विचारातून आम्ही हा पुढाकार घेतला व याला चांगला प्रतिसाद मिळाला ही आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन डॉ.पी.शिवस्वरुप यांनी केले.

 

टॅग्स :Policeपोलिस