शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘स्मार्टफोन’ने मोजता येणार ध्वनिप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:40 IST

‘नीरी’च्या तंत्रज्ञांनी ‘नॉईज ट्रॅकर’ नावाचे ‘मोबाईल अ‍ॅप’ विकसित केले आहे. या माध्यमातून कुणालाही शहरातील कुठल्याही जागी ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजता येणार आहे.

ठळक मुद्दे‘नीरी’चा अनोखा पुढाकार : विकसित केले ‘मोबाईल अ‍ॅप’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून ध्वनिप्रदूषणाची समस्या वाढीस लागली असून, नागपूरसारख्या शहरातदेखील याची तीव्रता जाणवायला लागली आहे. अनेकदा निर्धारित पातळीपेक्षा जास्त आवाज असूनदेखील सामान्य जनतेला त्याबाबत माहिती मिळू शकत नाही. हीच बाब लक्षात घेऊन ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे एक अनोखा पुढाकार घेण्यात आला आहे. ‘नीरी’च्या तंत्रज्ञांनी ‘नॉईज ट्रॅकर’ नावाचे ‘मोबाईल अ‍ॅप’ विकसित केले आहे. या माध्यमातून कुणालाही शहरातील कुठल्याही जागी ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजता येणार आहे.पर्यावरण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या मानकांनुसार दिवसाच्या वेळी ५५ डेसिबल्स तर रात्री ४५ डेसिबल्सच्या आत आवाजाची पातळी हवी. परंतु शहरातील अनेक भागांत दिवसभर ध्वनी तीव्रता ही याहून फार जास्त असते. विशेष म्हणजे लोकांना आपण ध्वनिप्रदूषणाच्या पट्ट्यात आहोत, याची जाणीवदेखील होत नसते. नागरिकांना हीच बाब कळावी व त्यादृष्टीने पुढील उपाययोजना करता याव्यात, यासाठी हे ‘मोबाईल अ‍ॅप’ विकसित करण्यात आले आहे.‘नीरी’तील वरिष्ठ तांत्रिक अधिकारी सतीश लोखंडे यांनी हे ‘अ‍ॅप’ तयार केले आहे. गुरुवारपासूनच ‘गुगल प्ले स्टोअर’वर हे ‘अ‍ॅप’ मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. सामान्य जनता, संशोधक यांच्यासह केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अधिकाऱ्यांसाठीदेखील हे ‘अ‍ॅप’ अतिशय सोयीचे राहणार आहे.आवाज मोजण्यासोबत ‘डाटा’देखील गोळा करणारहे ‘अ‍ॅप’ सामान्य जनता व संशोधक या दोघांनाही डोळ्यासमोर ठेवून विकसित करण्यात आले आहे. आवाजाची पातळी मोजणे व ‘डाटा’ गोळा करणे हे दोन्ही काम या माध्यमातून होऊ शकणार आहे. ‘जीपीएस’च्या माध्यमातून आवाजाचा नेमका ‘सोर्स’ काय आहे, हेदेखील शोधणे शक्य होणार आहे. ही सुविधा सर्वांना उपलब्ध राहील. तर आवाजाचा ‘डाटा’ व इतर तांत्रिक माहिती ही केवळ संशोधकांसाठी असेल. यात आवाजाची पातळी मोजणे, आवाज व ‘जीपीएस लोकेशन्स’चा ‘रेकॉर्ड’ ठेवणे इत्यादी कार्य होऊ शकणार आहे. विशेष म्हणजे हा ‘डाटा’ अगदी सहजतेने विविध प्रकारे ‘शेअर’देखील केल्या जाऊ शकतो. यात ‘मॅप इट’ नावाचे एक ‘फिचर’ असून, सर्व माहिती गोळा झाल्यानंतर संपूर्ण कार्यक्षेत्राचा ‘स्टडीमॅप’ तयार होऊ शकतो.कसे कार्य करते ‘अ‍ॅप’ ?‘जीपीएस’च्या माध्यमातून ‘अ‍ॅप’ संबंधितांचे नेमके स्थळ शोधतो. तर मोबाईलमधील मायक्रोफोनच्या माध्यमातून आवाजाची पातळी मोजली जाते. मोबाईलच्या ‘स्क्रीन’वर ही माहिती झळकते. वापर करणारी व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आवाजाची पातळी मोजू शकते आणि संपूर्ण ‘डाटा’ एखाद्या तक्त्याच्या स्वरुपात पाहू शकते, अशी माहिती सतीश लोखंडे यांनी दिली. या कामात मंथन कोल्हे व मोहिंद्र जैन यांचेदेखील मौलिक सहकार्य लाभले. तर ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले, असे प्रतिपादन लोखंडे यांनी केले.शहरात या भागात जास्त समस्यासीताबर्डी, धंतोली, धरमपेठ, रामदासपेठ, सदर, मानेवाडा, मेडिकल चौक, इतवारी, महाल, ऑटोमोटिव्ह चौक, रेल्वे स्थानक, बसस्थानक, बैद्यनाथ चौक

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानpollutionप्रदूषण