विहंग सालगट नागपूर उपराजधानीत लवकरच पोल टॉप मीटर लावण्यात येऊ शकतात. एसएनडीएल या दिशेने कामाला लागले आहे. यामुळे ग्राहकांना तर फायदा होईलच सोबतच एसएनडीएललासुद्धा वीजचोरी रोखण्यात मदत मिळू शकेल. महावितरणकडून हिरवी झेंडी मिळाली तर शहरातील वीज खांबावर लवकरच वीज मीटर दिसून येतील. महावितरणने काही महिन्यांपूर्वी कामठी येथे या प्रकारचे पोल टॉप मीटर लावले होते. मात्र याला सामान्य नागरिकांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळू शकलेला नाही. कारण यामुळे वीज बील अधिक येईल, अशी लोकांना भीती होती. आता एसएनडीएल या दिशेने पुढाकार घेत आहे. सध्या संबंधित एक प्रस्ताव महावितरणकडे पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतरच उपराजधानीतील काही भागांमध्ये ‘पोल टॉप मीटरला पायलट प्रोजेक्ट’ म्हणून सुरू करण्यात येणार आहे.
आता पोल टॉप मीटर
By admin | Updated: April 10, 2015 02:07 IST