शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता वेळेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 14:54 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : सरकारी काम म्हणजे महिनाभर थांब, असेच सामान्य नागरिक म्हणतात. ही प्रतिमा मोडित काढण्यासाठी लोकसेवा हमी कायदा करण्यात आला. यामुळे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.कायद्यानंतरही अधिकाऱ्यांची शिरजोरी कायम होती. त्यामुळे आता त्यांना दंडाची वेसण घालण्यात आली आहे. मुदतीत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाच हजारांपर्यंत दंड ...

ठळक मुद्देलोकसेवा हमी कायद्यात तरतूद

आॅनलाईन लोकमतनागपूर : सरकारी काम म्हणजे महिनाभर थांब, असेच सामान्य नागरिक म्हणतात. ही प्रतिमा मोडित काढण्यासाठी लोकसेवा हमी कायदा करण्यात आला. यामुळे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.कायद्यानंतरही अधिकाऱ्यांची शिरजोरी कायम होती. त्यामुळे आता त्यांना दंडाची वेसण घालण्यात आली आहे. मुदतीत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाच हजारांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. लोकसेवा हमी कायद्यात तशी तरतूद करण्यात आली आहे.सामान्य नागरिकांना प्रत्येक छोट्या कामासाठी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. चपला झिजल्या तरी काम होत नव्हते. एकाच कामासाठी वर्षानुवर्षे कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. यामुळे नागरिकांमध्ये शासनाप्रति प्रचंड चिड निर्माण झाली आहे. शासनाची प्रतिमा चांगली करून नागरिकांचे काम वेळेत करण्यासाठी शासनाने लोकसेवा हमी कायदा केला. या कायद्याच्या माध्यमातून कामांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.वेळेत काम न करणाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे. मात्र या कारवाईला अधिकाऱ्यांकडून भीकच घालण्यात आली नाही. कायद्यानंतरही नागरिकांचे काम वेळेत होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. अनेक प्रकरणात शिस्तभंगाची कारवाईच झाली नसल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. त्यामुळे शिरजोर अधिकारी तर शिस्तभंगाच्या कारवाईला भित नसल्याचे चित्र आहे. कायद्यात कारवाई संदर्भात कोणतीही ठोस तरतूद नसल्याने अधिकाऱ्यांवर याचा फारसा परिणाम होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. त्यामुळे आता कायद्याला आर्थिक दंडाची धार देण्यात आली आहे. यानुसार मुदतीत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यास पाचशे ते पाच हजारपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.मंत्रालयाला कायद्याच्या कार्यकक्षेत आणावेलोकसेवा हमी कायद्याच्या कार्यकक्षेत अनेक विभाग आणण्यात आले आहेत. मंत्रालय मात्र याच्या कार्यकक्षेत नाही. त्यामुळे अनेक विभागाकडून प्रस्ताव मंत्रालयात अडकल्याचे सांगून कामच करीत नाही. मंत्रालय कायद्याच्या कार्यकक्षेत नसल्याने त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही किंवा कारवाईची तरतूद नाही. त्यामुळे मंत्रालयही कायद्याच्या कार्यकक्षेत आणायला हवे, अशीच मागणी होत आहे.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयnagpurनागपूर