शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

पंतप्रधान घरकुलासाठी आता ऑनलाईन सोडत : मुख्यमंत्र्यांची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:19 IST

एनएमआरडीएच्या विविध विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षाच्या १५२९.८४ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एनएमआरडीए क्षेत्रात बांधण्यात आलेल्या घरकुलांची विक्री ऑनलाईन सोडतीद्वारे आणि घरकुल वाटपासाठी आरक्षण धोरण ठरविण्यासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देएनएमआरडीएच्या १५२९.८४ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरीनासुप्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही घरकुलात आरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एनएमआरडीएच्या विविध विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षाच्या १५२९.८४ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एनएमआरडीए क्षेत्रात बांधण्यात आलेल्या घरकुलांची विक्री ऑनलाईन सोडतीद्वारे आणि घरकुल वाटपासाठी आरक्षण धोरण ठरविण्यासही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) पाचवी बैठक गुरुवारी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झाली. पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, महापौर नंदा जिचकार, आमदार मिलिंद माने यावेळी उपस्थित होते. या बैठकीत घरकुल वाटपाकरिता आरक्षण धोरणासही मान्यता देण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जाती ११ टक्के, अनुसूचित जमाती ६ टक्के, दिव्यांग ५ टक्के, नागपूर सुधार प्रन्यास कर्मचारी २ टक्के आणि राज्य शासकीय/निमशासकीय कर्मचारी ५ टक्के असे आरक्षण ठेवण्यात आले आहे. आरक्षित घटकातील घरकुलास पात्र लाभार्थी उपलब्ध न झाल्यास ही घरकुले सर्वसाधारण गटात सोडतीद्वारे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेतील कामांची देयके प्राधिकरणाच्या निधीतून मंजूर कण्यास २५ कोटींची मर्यादा होती. ती १०० कोटी करण्यात आली आहे. बैठकीस गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मनीषा म्हैसकर, नागपूर विभागीय आयुक्त संजीवकुमार, नागपूर महापालिका आयुक्त अभिजित बांगर, एनएमआरडीएच्या महानगर आयुक्त शीतल तेली-उगले आदी उपस्थित होते.प्रतिनियुक्तीवर मिळतील १५६ कर्मचारीनागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आवश्यक १५६ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येस व ती पदे प्रतिनियुक्तीने भरण्यास मान्यता देण्यात आली. तसेच एनएमआरडीच्या कार्यकारी समितीमध्ये करण्यात आलेल्या सहा अशासकीय नियुक्तीलाही यावेळी मंजुरी प्रदान करण्यात आली. यावेळी एनएमआरडीएच्या बोधचिन्हाबाबत सादरीकरण करण्यात आले.काय काय होणारफुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटेन, साऊंड लेझर शो व अंबाझरी तलाव परिसरातील स्वामी विवेकानंद स्मारक परिसरात साऊंड लाईट शोसाठी १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.कार्य                                   निधीपंतप्रधान घरकूल योजना ४२२ कोटीकोराडी तीर्थक्षेत्र विकास आराखडा २२१ कोटीताजबाग दर्गा विकास आराखडा १३२ कोटीपोलीस गृहनिर्माण प्रकल्प १४५ कोटीडॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर ११४ कोटीदीक्षाभूमी विकास १०९ कोटीफुटाळा तलाव संगीत कारंजे १०० कोटीशांतिवन चिचोली ४१ कोटीचोखामेळा वसतिगृह ५८ कोटी

 

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस