शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता नागपूर-मुंबई विमानाचे रात्री उड्डाण, भाडे १९०० ते २ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:07 IST

विमाने रिक्त जाण्याऐवजी प्रवाशांकडून कमी भाडे घेऊन मुंबई आणि दिल्लीला जात आहेत. त्यामुळे मुंबईला जाणारे विमान नागपूर विमानतळावरून रात्री उड्डाण भरणार आहे.

ठळक मुद्देमदिनाहून येताहेत एअर इंडियाची विमाने : कंपनीची मध्यरात्रीनंतर दिल्ली विमानसेवा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मक्का येथे यात्रेसाठी गेलेले भाविक आता मदिनाहून नागपुरात एअर इंडियाच्या विमानाने परत येत आहेत. ही विमाने सकाळी, दुपारी आणि रात्री येणार आहेत. विमाने रिक्त जाण्याऐवजी प्रवाशांकडून कमी भाडे घेऊन मुंबई आणि दिल्लीला जात आहेत. त्यामुळे मुंबईला जाणारे विमान नागपूर विमानतळावरून रात्री उड्डाण भरणार आहे.मदिना येथून एकूण १२ विमानातून यात्रेकरू नागपुरात येणार आहेत. पहिले विमान १ सप्टेंबरला आले. दुसरे विमान गुरुवारी मध्यरात्रीनंतर रात्री २ वाजता येणार आहे. हेच विमान मुंबईला रिक्त जाण्याऐवजी एअर इंडियाने कमी फेअरची योजना आणली आहे. या विमानाचे भाडे १९०० ते २ हजारांदरम्यान आहे. एरवी नागपूर ते मुंबईचे भाडे ३५०० ते ५ हजार रुपयांदरम्यान असते. त्यामुळे रात्री प्रवास करताना प्रवाशांची आर्थिक बचत होणार आहे.एअर इंडियाचे वरिष्ठ स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे यांनी सांगितले की, एअर इंडियाची एकूण १२ विमाने मदिना येथून नागपुरात येणार आहेत. त्यापैकी ९ विमाने मुंबईला परत जातील. ही विमाने रिक्त जाण्याऐवजी कंपनीने कमी फेअर शुल्काची योजना आणली आहे. त्याचा प्रवाशांना फायदा होत आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर मुंबईला जाणाऱ्या १६० सिटचे एअर बस विमान फुल्ल आहे. याशिवाय वेळापत्रकानुसार प्रवाशांनी पूर्वीच बुकिंग केले आहे.याशिवाय एअर इंडिया २८ सप्टेंबरपासून नागपूर-दिल्ली आणि दिल्ली-नागपूर नवीन विमानसेवा रात्री सुरू करणार आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमानाचे भाडे कमी राहणार आहे. हे विमान रात्री २ वाजता उड्डाण करून पहाटे ३.४० वाजता दिल्लीला पोहोचणार आहे. तत्पूर्वी दिल्लीहून रात्री ११.३० वाजता निघून नागपुरात १.३५ वाजता पोहोचणार आहे.घरगुती प्रवासात एअर इंडिया पहिल्यांदाच मध्यरात्रीनंतर विमान सेवा सुरू करणार आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय मार्गावरच रात्री धावपट्टीचा उपयोग करण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास अन्य कंपन्याही विमानसेवा सुरू करण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीनंतर नागपुरातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना अन्य शहरात जाण्यासाठी कनेक्टिंग विमाने मिळतील.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाnagpurनागपूर