शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात विकास प्रकल्पांवर ‘मंथन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:53 IST

शहरातील विकास प्रकल्पांना गती मिळावी यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या पंंधरवड्यात तीनदा आढावा बैठक घेतली. यातील काही प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आता पुन्हा रविवारी २६ आॅगस्टला दुपारी १२ वाजता रामगिरी येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आगामी लोकसभा निवडणूक विचारात घेता केंद्रीय मंत्री शहरातील विकास प्रकल्पांना गती देण्याच्या प्रयत्नात आहेत.

ठळक मुद्देगडकरींच्या उपस्थितीत आज रामगिरीवर बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विकास प्रकल्पांना गती मिळावी यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या पंंधरवड्यात तीनदा आढावा बैठक घेतली. यातील काही प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आता पुन्हा रविवारी २६ आॅगस्टला दुपारी १२ वाजता रामगिरी येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आगामी लोकसभा निवडणूक विचारात घेता केंद्रीय मंत्री शहरातील विकास प्रकल्पांना गती देण्याच्या प्रयत्नात आहेत.गडकरी यांनी १२ आॅगस्टला २५ विषयावर बैठक आयोजित केली होती. यात महापालिका, नासुप्र, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम, मेट्रो रेल्वे विभागाशी संबंधित विकास प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. त्यानतंर गडकरी यांनी महापालिका मुख्यालयात २१ आॅगस्टला पुन्हा बैठक घेतली. त्यानंतर दिल्ली येथे नागनदी व ग्रीन बसच्या मुद्यावर महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाला फे ब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आठवडाभरात शहरात ग्रीन बस पुन्हा सुरू करण्यावर सहमती झाली.शहरातील विकास प्रकल्पांसदर्भात गडकरी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेत आहेत. यात आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प मेट्रो रेल्वेकडे देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. तसेच जयस्तंभ चौक ते मानस चौक , नेताजी मार्केटच्या विकासाची जबाबदारी मेट्रो रेल्वेकडे सोपविण्यात आली आहे. यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.या विषयावर होईल चर्चाबैठकीत आरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प मेट्रोमार्फत राबविण्याबाबत सहमती होण्याची शक्यता आहे. मागील बैठकीत गडकरी यांनी महापालिका व मेट्रो रेल्वेला करार करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मेट्रो रेल्वे , सदर येथील गोल बाजार, बर्डी येथील नेताजी मार्केट, संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, यशवंत स्टेडियमचा विकास, जयस्तंभ चौक ते मानस चौक दरम्यानचा उड्डाण पूल तोडून केंद्रीय रस्ते निधीतून प्राप्त झालेल्या २३४ कोटींतून या भागातील रस्त्याचा विकास करण्यावर चर्चा होईल. तसेच अंबाझरी परिसर विकास, फुटाळा तलाव प्रकल्पाचे सादरीकरण होईल. अ‍ॅग्रो व्हीजन कन्व्हेन्शन सेंटर साठी जमीन हस्तांतरणाचे सादरीकरण तसेच मिहान येथील अतिरिक्त जमीन अधिग्रहणाच्या मुद्यावर चर्चा होईल.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर