शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दारू तस्करांचा मोर्चा आता दिव्यांगांच्या कोचकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 22:27 IST

रेल्वे सुरक्षा दलाकडून दररोज विविध रेल्वेगाड्यात दारूची कारवाई करण्यात येत आहे. आरपीएफच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी दारू तस्करांनी शनिवारी आपला मोर्चा दिव्यांगांच्या कोचकडे वळविला. दक्षिण एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने तीन कारवाया करून ५,८८० रुपये किमतीची दारू जप्त केली.

ठळक मुद्देआरोपीला अटक : आरपीएफची दक्षिण एक्स्प्रेसमध्ये कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाकडून दररोज विविध रेल्वेगाड्यात दारूची कारवाई करण्यात येत आहे. आरपीएफच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी दारू तस्करांनी शनिवारी आपला मोर्चा दिव्यांगांच्या कोचकडे वळविला. दक्षिण एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने तीन कारवाया करून ५,८८० रुपये किमतीची दारू जप्त केली.रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक बी. एस. बघेल, एन. पी. वासनिक, जाहिद खान, विकास शर्मा हे सायंकाळी ६.४० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ३ वर गस्त घालत होते. त्यांना १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसच्या दिव्यांगांसाठी राखीव कोचमध्ये एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला. त्या व्यक्तीजवळ एक काळ्या रंगाची बॅग होती. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्यास आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक व्ही. डी. यादव यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्याने आपले नाव श्रीनिवास सत्यनारायण मूर्ती (४९) रा. खम्मम आंध्र प्रदेश सांगितले. संशयाच्या आधारे त्याच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १८०० रुपये किमतीच्या ३ बॉटल होत्या. दुसऱ्या घटनेत त्याच कोचमध्ये एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला. त्याच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या २२८० रुपये किमतीच्या ३ बॉटल आढळल्या. तिसऱ्या घटनेत त्याच कोचमध्ये एका बेवारस स्थितीत ठेवलेल्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये दारूच्या १८०० रुपये किमतीच्या ५२ बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेliquor banदारूबंदी