शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आता लायसन्स जप्त होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:58 IST

ज्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे, परवाना, पीयुसी, इन्शुरन्स ‘डिजी लॉकर’ प्रणालीत साठवून ठेवली आहे, त्यांच्याकडून मोटार वाहन निरीक्षकांनी मूळ कागदपत्राची मागणी करू नये, अशा सूचना परिवहन आयुक्तांनी शनिवारी दिल्या. विशेष म्हणजे, दोषी वाहन चालकाचा परवाना जप्त करायचा असल्यास त्याची नोंद ई-चालनच्या माध्यमातून किंवा सारथी प्रणालीतून करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

ठळक मुद्दे थेट सारथी प्रणालीत होणार नोंद : परिवहन आयुक्तांनी दिले आदेश : ‘डिजी लॉकर’मध्ये वाहनाची कागदपत्रे अधिकृत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे, परवाना, पीयुसी, इन्शुरन्स ‘डिजी लॉकर’ प्रणालीत साठवून ठेवली आहे, त्यांच्याकडून मोटार वाहन निरीक्षकांनी मूळ कागदपत्राची मागणी करू नये, अशा सूचना परिवहन आयुक्तांनी शनिवारी दिल्या. विशेष म्हणजे, दोषी वाहन चालकाचा परवाना जप्त करायचा असल्यास त्याची नोंद ई-चालनच्या माध्यमातून किंवा सारथी प्रणालीतून करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.केंद्र सरकारने नागरिकांसाठी ‘डिजी लॉकर’सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात वाहनाच्या संदर्भातील कागदपत्रांसोबतच पॅन कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे आणि आता वाहनाचे इन्शुरन्सही साठविता येणे शक्य झाले आहे. ‘डिजी लॉकर’ हे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाशी जोडले गेले आहे. तसेच या ‘अ‍ॅप’वरील कागदपत्रे ग्राह्य धरली जावीत, अशा सूचना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाने दिल्या आहेत. सध्या डिजिलॉकर हे ‘अ‍ॅप’ ‘अँड्रॉईड’ व ‘आयओएस’वर उपलब्ध आहे. मात्र, ‘एम- परिवहन’ हे अ‍ॅप सध्या ‘अँड्रॉईडवर’ उपलब्ध असून येत्या १० दिवसात ते ‘आयओएसवर’ही उपलब्ध होणार आहे. वाहतूक पोलिसांना किंवा मोटार वाहन निरीक्षकांना या ‘अ‍ॅप’वरील कागदपत्रांची तपासणी करायची असल्यास तिथे ‘क्युआर कोड’ची सुविधा आहे. त्या कोडचा वापर करून वाहन चालकाचे नाव, पत्ता, मोबाईल, क्रमांक, जन्मतारीख, वाहन क्रमांक, इंजिन क्रमांक, चेसीस क्रमांक आदी बाबीची सत्यता पडताळता येते. यामुळे ज्या वाहनधारकांनी आपली कागदपत्रे ‘डिजी लॉकर’मध्ये साठवली आहे त्यांना ती सोबत बाळगणे गरजेचे नाही. अशा वाहनचालकांनी आपल्या मोबाईलच्या या ‘अ‍ॅप’मधील डिजिटल कागदपत्रे दाखविल्यास ती ग्राह्य धरावी व त्यांच्या विरुद्ध केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून नये, अशा सूचना परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी सर्व आरटीओ कार्यालयांना व वाहतूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परंतु अशा वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचा भंग झाल्यास आणि कारवाई म्हणून वाहन परवाना जप्त करायचा असल्यास त्याची नोंद ई-चालनच्या माध्यमातून किंवा सारथी प्रणालीमध्ये करावी, असे निर्देशही दिले आहेत. मात्र, मोटार वाहन निरीक्षक किंवा तत्सम अधिकाऱ्यांना या प्रणालीबाबत किती माहिती आहे आणि कारवाईसाठी कुठल्या प्रणालीचा वापर करावा याचे कितपत ज्ञान आहे, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर