शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून कळेल पाणी ‘लिकेज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 11:13 IST

‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) ‘सीटीएमडी’तर्फे (क्लिअर टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड मॉडेलिंग डिव्हिजन) यासंदर्भात संशोधन करुन ‘सॉफ्टवेअर’ विकसित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे‘नीरी’त अनोखे संशोधन‘जीएसआय’ आधारित ‘सॉफ्टवेअर’ केले तयार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये ‘लिकेज’ची समस्या ही अनेकदा डोकेदुखी ठरते. यामुळे दूषित पाणीपुरवठा होतो व ‘लिकेज’ला शोधणे हे एक मोठे आव्हानच ठरले. परंतु आता चक्क ‘सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून हे ‘लिकेज’ शोधता येणार आहे. ‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) ‘सीटीएमडी’तर्फे (क्लिअर टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड मॉडेलिंग डिव्हिजन) यासंदर्भात संशोधन करुन ‘सॉफ्टवेअर’ विकसित करण्यात आले आहे. चांगल्या पाणीपुरवठा प्रणालीसाठी तयार करण्यात आलेले ‘सॉफ्टवेअर’ हे ‘जीएसआय’ तंत्रज्ञानावर आधारित आहे व याला ‘रिस्क-पायनेट’ असे नाव देण्यात आले आहे. अनेक महानगरपालिकांमध्ये याची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे तर नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारी कंपनी ‘ओसीडब्ल्यू’नेदेखील ‘नीरी’तून हे तंत्रज्ञान घेतले आहे. ‘सीटीएमडी’च्या वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ.आभा सारगांवकर व वरिष्ठ वैज्ञानिक आशिष शर्मा यांनी हे ‘सॉफ्टवेअर’ विकसित केले आहे.जुन्या शहरी भागात असलेल्या पाईपलाईनमध्ये जर ‘लिकेज’ झाले तर त्याला ठीक करणे हे मोठे आव्हान असते. त्यासाठी संबंधित पाईपलाईनच्या क्षेत्रात खोदकाम करावे लागते. अनेकदा तरीदेखील ‘लिकेज’ सापडत नाही. परंतु ‘जीएसआय’ आधारित ‘रिस्क-पायनेट’च्या माध्यमातून खराब झालेली पाईपलाईन, ‘लिकेज’ इत्यादी सहजपणे शोधल्या जाऊ शकते. दूषित पाण्याची समस्या दूर करण्यासाठी हे ‘सॉफ्टवेअर’ अतिशय उपयुक्त आहे, अशी माहिती डॉ.सारगांवकर यांनी दिली.नागरिकांपर्यंत शुद्ध पाणी पोहोचावे या उद्देशाने ‘सीटीएमडी’ने हे ‘सॉफ्टवेअर’ विकसित केले आहे. याचे चांगले परिणाम समोर येत आहेत. महानगरपालिकेमध्ये पाणी वितरण प्रणालीला जर आणखी प्रभावी करायचे आहे तर हे ‘सॉफ्टवेअर’ अतिशय उपयोगी आहे. देशभरातील अनेक महानगरपालिकांनी ‘नीरी’ला या ‘सॉफ्टवेअर’ची माहिती मागितली आहे, असे आशिष शर्मा यांनी सांगितले.

हैदराबादमध्ये वापरले ‘सॉफ्टवेअर’‘रिस्क-पायनेट’चा उपयोग सर्वात अगोदर हैदराबाद जल मंडळाने केला. या ‘सॉफ्टवेअर’मुळे मंडळाला मोठे सहकार्य झाले. पेयजल प्रणाली मजबूत करणे हेच या ‘सॉफ्टवेअर’चे उद्दिष्ट आहे. हैदराबादसह अमरावती महानगरपालिका, नागपूर महानगरपालिकेअंतर्गत ‘ओसीडब्लू’ याचा उपयोग करत आहे.

असे काम करते ‘सॉफ्टवेअर’हे ‘सॉफ्टवेअर’ पूर्णत: उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ‘डाटा’च्या आधारावर काम करते. यासाठी पाईपलाईनची रुंदी, लांबी, कालावधी, पाण्याचा दबाव इत्यादींचा सुयोग्य ‘डाटा’ आवश्यक आहे. सोबतच किती वेळा पाईपलाईनमध्ये ‘लिकेज’ झाले हेदेखील सांगावे लागते. ‘जीएसआय मॅपिंग’मध्ये संबंधित ‘डाटा’ टाकल्या जातो. त्यानंतर संभाव्य ‘लिकेज’ स्थळाची माहिती कळते. जेथे ‘लिकेज’ असल्याचे कळते, त्या जागेचे सर्वेक्षण करण्यात येते. नागरिकांशी चर्चा करण्यात येते व पाण्याचे नमुने तपासले जातात. त्यानंतर ‘लिकेज’ची नेमकी माहिती कळते.

विविध शहरांच्या प्रतिनिधींना सादरीकरण‘रिस्क पायनेट’ या ‘सॉफ्टवेअर’चे विविध शहरे तसेच महानगरपालिकांच्या प्रतिनिधींसमोर सादरीकरण करण्यात आले. यात चेन्नई, पुणे, नवी मुंबई, बिलासपूर, रायपूर, अकोला, यवतमाळ, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण इत्यादींचे प्रतिनिधी होते. यासोबत भविष्यात मोठ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांनादेखील बोलविण्याची योजना आहे.

टॅग्स :Waterपाणी