शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आता कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून पळवाट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:27 IST

निवडणुकीचे काम हे देशहिताचे काम असले तरी निवडणूक लागली की, अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगून निवडणुकीच्या कामातून पळवाट काढत असतात. परंतु आता अशा कर्मचाऱ्यांना पळवाट काढता येणार नाही. कारण निवडणूक विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रानंरतच (एनओसी) अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार काढावे, असे पत्र जिल्हाधिकारी यांनी कोषागार विभागाला दिले आहे. यामुळे निवडणुकीच्या कामापासून पळवाट काढणाऱ्यांची चांगलीच अडचण होणार आहे.

ठळक मुद्देनिवडणूक विभागाच्या एनओसीनंतरच पगार : जिल्हाधिकाऱ्यांचे कोषागार विभागाला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीचे काम हे देशहिताचे काम असले तरी निवडणूक लागली की, अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगून निवडणुकीच्या कामातून पळवाट काढत असतात. परंतु आता अशा कर्मचाऱ्यांना पळवाट काढता येणार नाही. कारण निवडणूक विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रानंरतच (एनओसी) अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार काढावे, असे पत्र जिल्हाधिकारी यांनी कोषागार विभागाला दिले आहे. यामुळे निवडणुकीच्या कामापासून पळवाट काढणाऱ्यांची चांगलीच अडचण होणार आहे.निवडणुकीचे काम देशहिताचे आहे. या कामाला प्राथमिकता देणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणूक होणार असून याची तयारी प्रशासनकडून करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात नागपूर आणि रामटेक अशा दोन लोकसभा जागा आहेत. या कामासाठी जवळपास ४० हजार कर्मचाऱ्यांनी गरज भासणार आहे. महूसल विभागाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा या कामासाठी घेण्यात येते. या करता जिल्हा निवडणूक विभागाने सर्व विभाग प्रमुखांना पत्र पाठवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास सांगितले आहे. मात्र आतापर्यंत अनेक विभागाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नावेच पाठविण्यात आली नाही. काहींची नावे असली तरी अद्याप नोंद केली नाही. यामुळे निवडणुकीच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागप्रमुखांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आली नसल्याने जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार करताना निवडणूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय पगारच काढू नये, असे पत्रच जिल्हाधिकारी यांनी कोषागार विभागाला पाठविले आहे. यामुळे आता निवडणूक कामात रुजू न होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पगारच होणार नसल्याचे सांगण्यात येते. त्याच प्रमाणे काही विभागांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांकडून मिळाली.

टॅग्स :Employeeकर्मचारीElectionनिवडणूक