शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘ड्रोन’ करणार वायुप्रदुषणाचे ‘निरीक्षण’ : ‘नीरी’च्या वैज्ञानिकांचे संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 23:08 IST

‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) वैज्ञानिकांच्या भगीरथ प्रयत्नाने . ‘ड्रोन’च्या माध्यमातून वायुप्रदूषणाची पातळी मोजणे शक्य होणार असून या तंत्रज्ञानाला त्यांनी ‘निरीक्षण’ असे नाव दिले आहे.

ठळक मुद्देदेशातील पहिलाच प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या काळामध्ये वायुप्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. परंतु अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे जमिनीपासून उंचावर तसेच इमारतींच्या वरील मजल्यांवर, दोन इमारतींच्या मध्ये येणाऱ्या भागात वायुप्रदूषणाची पातळी किती आहे हे मोजणे अशक्य असते. हीच बाब लक्षात घेऊन ‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) वैज्ञानिकांनी भगीरथ प्रयत्न केले व एक अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली. ‘ड्रोन’च्या माध्यमातून वायुप्रदूषणाची पातळी मोजणे शक्य होणार असून या तंत्रज्ञानाला त्यांनी ‘निरीक्षण’ असे नाव दिले आहे.संगणक यंत्रणेच्या साहाय्याने ठिकठिकाणच्या वायुप्रदूषणाचा अंदाज बांधणे कठीण आहे. नमुन्याची किंमत, ठिकाणांची आणि निरीक्षण तज्ज्ञांची अनुपलब्धता हे देखील अनेकदा हवेच्या गुणवत्ता निरीक्षणात अडथळे म्हणून उभे राहू शकतात. साधारणत: एखाद्या वाहनावर ‘सेन्सर्स’ लावून मग ‘डाटा’ एकत्रित करण्यात येतो. परंतु उंचीवर नमुने घेता येत नाही. ‘नीरी’च्या संशोधकांनी अभिनव प्रयोगाला सुरुवात केली. त्यांनी व्यावसायिक ‘ड्रोनवर’ एक प्रयोग विकसित केला. यात अतिशय कमी वजनाचे ‘सेन्सर’ लावण्यात आले आहेत. गरज आणि क्षमतेनुसार विविध ‘सेन्सर’ या ‘ड्रोन’ला जोडले जाऊ शकतात. ही यंत्रणा शहरी आणि ग्रामीण भागात विविध उंचीवर जाऊन हवा गुणवत्तेच्या पीएम, एसओटू, एनओएक्स, सीओ यासारख्या विविध मापदंडाचा अभ्यास करू शकते. ‘नीरी’चे मुख्य वैज्ञानिक डॉ.नितीन लाभसेटवार, पीयूष कोकाटे, डॉ.अनिर्बान मिडडे, अंकित गुप्ता, सागर निमसडकर यांच्या चमूने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.‘झेड अ‍ॅक्सिस’वरील नवे तंत्रज्ञानया नव्या यंत्रणेतील ‘मल्टी-रोटर’ यूएव्ही तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय सेन्सर यामुळे आकाशातील अडथळ्यांसह शहरी वातावरणातील गर्दीतसुद्धा ‘झेड एक्सिस’ वरील ‘डाटा’ मिळू शकतो. हा ‘डाटा’ भरवशाचा मानल्या जातो. शिवाय या माध्यमातून हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जाऊ शकतात. ‘नीरी’च्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या यंत्रणेमुळे शहराच्या विविध भागातील उंच इमारतीत राहणाºया नागरिकांना वायु प्रदूषणाच्या धोक्याची माहिती मिळू शकेल. वायू प्रदूषण किंवा हवा गुणवत्ता मोजण्याच्या पूर्वीच्या पद्धतीपेक्षा ही नवीन युएव्ही आधरित पद्धत अधिक सोपी आणि व्यवहार्य आहे, अशी माहिती पीयूष कोकाटे यांनी दिली. ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार यांचे आम्हाला मौलिक मार्गदर्शन लाभले असेदेखील त्यांनी सांगितले.‘सेन्सर्स’ बसविण्याचे होते आव्हान‘नीरी’च्या वैज्ञानिकांसमोर सर्वात मोठे आव्हान होते ते ‘ड्रोन’वर ‘सेन्सर्स’ बसविण्याचे. उंचीवर असताना हवेच्या दाबामुळे व वेगामुळे ‘सेन्सर्स’ हलू शकतात व त्यामुळे ‘डाटा’ चुकीच्या पद्धतीने मोजल्या जाऊ शकतो. परंतु या तंत्रज्ञानात हवेचा कुठलाही परिणाम होत नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषणtechnologyतंत्रज्ञान