शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आता होणार खासगीकरणातून नागपूर विमानतळाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास, आधुनिकीकरण, देखभाल ही कामे सार्वजनिक-खासगी भागीदारीतून आणि संकल्पना, बांधणी, वित्तसाहाय्य पुरविणे, चालविणे आणि हस्तांतर करणे (डीबीएफओटी) या तत्त्वावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांना बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे खासगीकरणातून विमानतळाचा विकास आता खरोखरच होणार आहे.

ठळक मुद्देआरएफक्यू व सवलत करारनामा कागदपत्रांना कॅबिनेटची मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास, आधुनिकीकरण, देखभाल ही कामे सार्वजनिक-खासगी भागीदारीतून आणि संकल्पना, बांधणी, वित्तसाहाय्य पुरविणे, चालविणे आणि हस्तांतर करणे (डीबीएफओटी) या तत्त्वावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांना बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे खासगीकरणातून विमानतळाचा विकास आता खरोखरच होणार आहे.नागपूर येथे आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक विमानतळ (मल्टी-मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अ‍ॅण्ड एअरपोर्ट अ‍ॅट नागपूर) विकसित होत आहे. या प्रकल्पात नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विशेष आर्थिक क्षेत्र व संलग्न सेवा-व्यवसाय असे दोन उपप्रकल्प समाविष्ट आहेत.नागपूर विमानतळ हे भारताच्या केंद्रस्थानी असणारे महत्त्वाचे विमानतळ आहे. सध्या मिहान इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत विमानतळाचे संचालन करण्यात येते. मिहान इंडिया या संयुक्त कंपनीमध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (एएआय) यांचा अनुक्रमे ५१ आणि ४९ टक्के टक्के वाटा आहे. या दोन घटकांनी केलेल्या करारनाम्यानुसार या विमानतळाचा विकास खासगी विकासकाकडून करण्यात येणार आहे.नागपूर विमानतळाचा विकास सार्वजनिक-खासगी भागीदारीतून करण्याचा निर्णय २३ जुलै २०१७ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विनंती (आरएफक्यू-रिक्वेस्ट फॉर कोटेशन) प्रक्रियेद्वारे पाच कंपन्यांची निवड करण्यात आली. या पाच कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यासाठी, प्रस्तावाकरिता विनंती (आरएफपी-रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) आणि सवलत करारनामा (कन्सेशन अ‍ॅग्रीमेंट) या दस्तऐवजांना मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली आहे.

टॅग्स :Airportविमानतळnagpurनागपूर