शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आता महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात ग्राहक तक्रार निवारण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:36 IST

जून महिन्यात पाठवण्यात आलेल्या तीन महिन्याच्या वीज बिलाबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहे. यासोबतच वीज बिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळावे व ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देवीज बिलांबाबत शंका, तक्रारी दूर करणार : वेबिनार व मेळाव्यांद्वारे ग्राहकांशी संवाद साधणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिन्यात पाठवण्यात आलेल्या तीन महिन्याच्या वीज बिलाबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहे. यासोबतच वीज बिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळावे व ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात येत आहे.लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीज बिल देण्यात आले. सध्या, मीटर रीडिंग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीज बिल देण्यात येत आहे. या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडल स्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.महावितरणने ग्राहकांना पाठविलेल्या तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलाबाबत सोशल मीडियावरून मेसेजद्वारे अफवा पसरविण्यात येत आहे. मात्र ग्राहकांनी या मेसेजवर विश्वास ठेवू नये. महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर केवळ ग्राहक क्रमांक नमूद करून वीज बिलाची सविस्तर आकारणी तपासून पाहावी. यानंतरही काही शंका किंवा तक्रारी असल्यास महावितरणच्या कार्यालयात वीज बिलाबाबत योग्य माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.लोकप्रतिनिधींशीही संवाद साधणारयाशिवाय परिमंडळ अंतर्गत जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच खासदार, आमदार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांची महावितरणचे अधिकारी तात्काळ भेट घेऊन त्यांना माहे जून २०२० महिन्याच्या वीज बिलाबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल. हे वीज बिल रीडिंगनुसार अचूक आहे तसेच वीजग्राहकांवर एकाही पैशाचा भुर्दंड पडलेला नाही याबाबत सविस्तरपणे लोकप्रतिनिधींना समजावून सांगण्यात येणार आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल