शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

आता स्वस्त औषधांसाठी ‘अमृत आऊटलेट फार्मसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:37 IST

नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह, चंद्रपूर मेडिकल व यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालात पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्र शासानाची अंगिकृत कंपनी एचएलएल लाईफ केअर लिमिटेड मार्फत ‘अमृत आऊटलेट फार्मसी’ सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या औषध दुकानातून विशेषत: कर्करोग व हृदयरोगांवरील औषधे बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देकर्करोग व हृदयरोगावरील औषधे मिळणार कमी दरातनागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळच्या मेडिकलची निवड

आॅनलाईन लोकमतनागपूर: नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह, चंद्रपूर मेडिकल व यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालात पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्र शासानाची अंगिकृत कंपनी एचएलएल लाईफ केअर लिमिटेड मार्फत ‘अमृत आऊटलेट फार्मसी’ सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या औषध दुकानातून विशेषत: कर्करोग व हृदयरोगांवरील औषधे बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार आहे.भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत या रोगाच्या अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. यात मुखाच्या कॅन्सरमध्ये नागपूर अव्वल स्थानी आहे तर ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’ मध्ये विदर्भ राजधानी बनत आहे. याचे प्रमाण ४० टक्क्यांवर गेले आहे. कर्करोगासोबतच अयोग्य जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अंतर्गत येणाºया बहुसंख्य मेडिकलमध्ये या दोन्ही आजारांवर उपचार होतात. परंतु या योजनेसाठी नागपूरमधील दोन तर यवतमाळ व चंद्रपूर येथील एक-एक मेडिकलची निवड करण्यात आली. या चारही मेडिकलमध्ये आता ‘अमृत आऊटलेट फार्मसी’ ही योजना सुरू होत आहे. या योजनेंतर्गत ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कंपनी’द्वारे कर्करोगाच्या रुग्णांसाठी लागणारी २०२ प्रकारची औषधे, हृदयरोग रुग्णांसाठी लागणारी १८६ औषधांसह १४८ इतर औषधे बाजारभावापेक्षा कमी दराने उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाने एचएलएल लाईफ केअर लिमिटेड या केंद्र शासन अंगिकृत कंपनीची देशभरात अमृत आऊटलेट फार्मसी उघडण्यासाठी समन्वय अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. या चारही मेडिकलमध्ये अमृत आऊटलेट फार्मसी सुरू करण्याच्या अनुषंगाने ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड’ या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास व या करारावर स्वाक्षरी करण्यास संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांना परवानगी देण्यात आली आहे. तसे पत्र शनिवारी प्राप्त झाले आहे.

टॅग्स :medicinesऔषधंnagpurनागपूर